अॅडिलेड - ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. मालिकेतील पहिला सामना अॅडिलेडवर डे-नाईट पद्धतीने खेळवला जात असून यात गुलाबी चेंडूचा वापर होत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून कॅमरून ग्रीन कसोटी पदार्पण करत आहे.
मालिका विजयासाठी असणार प्रयत्न -
भारताची यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली होती. एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी गमावली. पण, त्यानंतर संघाने मुसंडी मारत टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. त्यामुळे दोन मालिकांची कामगिरी १-१ अशी असल्याने ही कसोटी मालिका जिंकून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ तयारीत असणार आहेत.
भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियन संघ - जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशाने, स्टिव्हन स्मिथ, ट्राविस हेड, कॅमरून ग्रीन, टीम पेन (यष्टीरक्षक, कर्णधार) पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवूड.