ETV Bharat / sports

Cricketer KL Rahul : भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे केएल राहुल बाहेर, 'हा' खेळाडू करणार भारतीय संघाचे नेतृत्व - Rishabh Pant

भारतीय संघासाठी एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल हा टी-20 मालिकेतून बाहेर पडला ( KL Rahul Ruled Out T20 Series ) आहे. कर्णधार केएल राहुल हा दुखापतीमुळे टी-20 मालिकेला मुकला आहे.

KL Rahul
KL Rahul
author img

By

Published : Jun 8, 2022, 7:12 PM IST

Updated : Jun 8, 2022, 7:45 PM IST

दिल्ली: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला ( India vs South Africa T-20 Series ) 9 जून पासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघासाठी एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल हा टी-20 मालिकेतून बाहेर पडला ( KL Rahul Ruled Out T20 Series ) आहे. कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे टी-20 मालिकेला मुकला आहे. याबाबत बीसीसीआयने ट्विट करुन माहिती दिली आहे.

केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचे कर्णधारपद दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्यात आले आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत ( Wicketkeeper-batsman Rishabh Pant ) आहे. त्याचबरोबर उपकर्णधार पदाची जबाबदारी हार्दिका पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.पंत गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्याने प्रथमच नेतृत्व करताना आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून दिले आहे.

  • NEWS 🚨- KL Rahul and Kuldeep Yadav ruled out of #INDvSA series owing to injury.

    The All-India Senior Selection Committee has named wicket-keeper Rishabh Pant as Captain and Hardik Pandya as vice-captain for the home series against South Africa @Paytm #INDvSA

    — BCCI (@BCCI) June 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या मालिकेकडे टी-20 विश्वचषकाची तयारी म्हणून पाहिले जात आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवार, ९ जूनपासून दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, महान फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना आयपीएलमध्ये सतत खेळल्यामुळे या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत राहुलची दुखापत हा संघासाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे.

दिल्लीतील टी-20 सामना जिंकत सलग 13 T20 सामने जिंकून भारताला विश्वविक्रम करण्याची संधी आहे. भारताने यापूर्वी सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत. मात्र, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या विक्रमाला फारसे महत्त्व देत नाहीत. त्याची नजर टी-20 विश्वचषकावर आहे. अशा स्थितीत तो नव्या आणि अनुभवी खेळाडूंची चाचपणी करण्याचा प्रयत्न करतील.

  • KL Rahul has been ruled out of the T20I series against South Africa owing to a right groin injury while Kuldeep Yadav will miss out in the T20I series after getting hit on his right hand while batting in the nets last evening.

    More details here - https://t.co/KDJwRE9tCz #INDvSA

बीसीसीआयने सांगितले की, केएल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे (पोट आणि मांडीच्या दरम्यान दुखापत). तर कुलदीप यादवला नेट सरावात फलंदाजी करताना उजव्या हाताला दुखापत झाली आहे. अशा स्थितीत दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. निवड समितीने यष्टिरक्षक ऋषभ पंतची कर्णधार आणि हार्दिक पंड्याला उपकर्णधारपदी नियुक्त केले आहे.

या मालिकेपूर्वी कर्णधार विराट कोहली, सध्याचा नियमित कर्णधार रोहित शर्मा यांना आधीच विश्रांती देण्यात आली आहे. भारताचे टॉप-3 खेळाडू राहुलच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव हेही संघात नाहीत. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.

भारतीय संघ : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवन कुमार, हरिभन कुमार पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

हेही वाचा - Ind Vs Sa T 20 Series : विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंची चाचपणी करण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात

Last Updated : Jun 8, 2022, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.