ETV Bharat / sports

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय; भारतानं मालिका घातली खिशात - एडन मार्करम

IND vs SA 3rd ODI : भारतीय क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिका संघावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मात करत मालिकेवर कब्जा केला. भारतीय संघान तीन एकदिवसीय सामन्याची ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात खेळताना भारतीय संघाचा फलंदाज संजू सॅमसन यानं आपलं धडाकेबाज शतक झळकावलं.

IND vs SA 3rd ODI
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 8:19 AM IST

Updated : Dec 22, 2023, 10:42 AM IST

पर्ल IND vs SA 3rd ODI : तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेत भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका संघावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. तिसरा सामना जिंकत भारतीय क्रिकेट संघानं ही मालिका खिशात घातली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून खेळताना संजू सॅमसननं जोरदार शतक झळकावलं. त्याच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका संघावर विजय प्राप्त केला.

दक्षिण आफ्रिकेला 296 धावांचं आव्हान : दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार एडन मार्करमनं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केलं. पर्ल इथं खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी जोरदार खेळाचं प्रदर्शन केलं. भारताचा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसननं जोरदार फलंदाजी करत एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शतक झळकावलं. भारतीय संघानं 8 फलंदाज गमावून 296 धावा केल्या. संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका संघाला 50 षटकात 297 धावांचं लक्ष्य देण्यात आलं.

सलामीचे फलंदाज स्वस्तात परतले माघारी : भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना आपले सलामीचे फलंदाज स्वस्तात गमावले. भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करणारा रजत पाटीदार 16 चेंडूत 22 धावा करुन माघारी परतला. तर पहिल्या दोन्ही सामन्यात जोरदार फलंदाजी करणारा साई सुदर्शन 16 चेंडूत केवळ 10 धावा करुन बुरेन हेंड्रीक्सचा बळी ठरला. दोन्ही सलामीवीर 49 धावांवर माघारी परतल्यानंतर संजू सॅमसननं खेळाची सूत्रे आपल्याकडं घेतली.

संजू सॅमसनची जोरदार फटकेबाजी : संजू सॅमसननं कर्णधार के एल राहुलच्या मदतीनं डाव सावरला. या दोघांनी 18.3 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर मात्र के एल राहुलला 35 चेंडूत 21 धावांवर बाद झाला. वियान मुल्डरनं त्याला बाद केलं. त्यानंतर आलेल्या तिलक वर्मानं संजू सॅमसनला चांगली साथ दिली. या जोडगोळीनं दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी फोडून काढली. तिलक वर्मानं 75 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्याला केशव महाराजनं तंबूचा रस्ता दाखवला. दुसरीकडं संजू सॅमसननं 110 चेंडूत आपलं शतक साजरं करत भारतीय संघाला मजबूत धावसंख्या गाठून दिली. मात्र रिझा हँड्रीक्सनं त्याला झेलबाद केलं. संजू सॅमसननं 114 चेंडूत 108 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रिंकू सिंहनं जोरदार फलंदाजी करत 27 चेंडूत 38 धावा केल्या. तर अर्शदीप 7 आणि आवेज खान 1 धावेवर नाबाद राहिले. भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी 297 धावांचं लक्ष्य दिलं. त्यानंतर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव करत मालिका खिशात घातली.

हेही वाचा :

  1. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार, 'या' २ खेळाडूंना मिळाला 'खेलरत्न'
  2. IPL 2024 Auction : ७२ खेळाडूंवर २३० कोटी रुपये खर्च! स्टार्क-कमिन्स मालामाल, स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड
  3. जे धोनीलाही जमलं नाही ते ऋषभ पंतनं केलं! आयपीएलच्या लिलावात बसताच रचला इतिहास; 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार

Last Updated : Dec 22, 2023, 10:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.