भारताचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या नव्या इनिंगची विजयी सुरुवात केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 5 गडी राखून पराभूत केले. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 164 धावा करून भारतासमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी दमदार अर्धशतके ठोकली. प्रत्युत्तरात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले तर, रोहितने ४८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्माचं 2 धावांनी अर्धशतक हुकलं. मिचेल सॅंटनरच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद झाला. शेवटच्या षटकात १० धावांची गरज असताना पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी एक-एक चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
IND vs NZ 1st T20I : भारताचा न्यूझीलंडवर 5 विकेट्सने विजय, सूर्यकुमार यादवचे अर्धशतक - भारत न्यूझीलंड पहिला टी-20
22:45 November 17
भारताचा न्यूझीलंडवर पाच गडी राखून विजय
21:43 November 17
टीम इंडियासमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व न्यूझीलंडला फलंदाजीस पाचारण केले. मार्टीन गप्टील व डॅरिल मिशेलने न्यूझीलंच्या डावाच्या सुरुवात केली. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर सलामीवीर डॅरिल मिशेलची शून्यावर दांडी गुल करत न्यूझीलंडला पहिलाच धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी संघाला सावरले. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी १०९ धावांची भागीदारी केली. हे दोघे संघाला मोठी धावसंख्या गाठून देणार असे वाटत असताना रोहितने अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनच्या हाती चेंडू सोपवला. अश्विनने एकाच षटकात चॅपमन आणि त्यानंतर आलेल्या ग्लेन फिलिप्सला शुन्यावर तंबूत धाडून न्यूझीलंच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. चॅपमनने ६ चौकार आणि २ षटकारांसह 50 चेंडूत ६३ धावा केल्या.
दुसऱ्या बाजूने गप्टिलने आक्रमक फलंदाजी केली. संघाच्या दीडशे धावा फलकावर लावल्यानंतर वेगवान गोलंदाज दीपर चहरने गप्टिलला माघारी पाठवले. गप्टिलने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ७० धावा केल्या. गप्टिलनंतर न्यूझीलंडचे इतर फलंदाज ढेपाळले. भारताने शेवटच्या चार षटकात भेदक मारा केला. एकवेळी न्यूझीलंडची धावसंख्या 180-190 पर्यंत पोहचेल असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत किवी फलंदाजांना जखडून टाकले. न्यूझीलंडला २० षटकात ६ बाद १६४ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून भुवनेश्वर आणि अश्विनने प्रत्येकी २ बळी घेतले.
20:10 November 17
न्यूझीलंडला तिसरा धक्का, ग्लेन फिलिप्स शुन्यावर बाद
न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. आर अश्विनने ग्लेन फिलिप्सला पायचीत करून माघारी धाडले. त्याने 3 चेंडूचा सामना केला मात्र त्याला खातेही खोलता आले आहे. मार्टीन गप्टील 44 धावांवर खेळत आहे.
20:08 November 17
न्यूझीलंडला दुसरा धक्का, अर्धशतक झळकावून चॅपमन माघारी
आर अश्विनने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. आक्रमक रुप घेतलेल्या मार्क चॅपमनचा अश्विनने त्रिफळा उडवला. चॅपमनने 50 चेंडूत 63 धावा केल्या. यामध्ये सहा चौकार व 2 षटकारांचा समावेश आहे.
19:32 November 17
पॉवरप्लेमध्ये न्युझीलंडच्या 1 बाद 41 धावा
पहिल्या सहा षटकात न्युझीलंडने 1 बाद 41 धावा केल्या आहेत. मार्टीन गप्टील व मार्क चॅपमन खेळत आहेत.
19:30 November 17
सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर किवींना धक्का
भुवनेश्वरकुमारने टाकलेल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर पाहुण्या न्युझीलंड संघाला पहिला धक्का बसला. सलामीवीर डॅरिल मिशेलचा भुवीने शुन्यावर त्रिफळा उडवला. त्यानंतर चॅपमन मैदानात उतरला.
19:04 November 17
व्यंकटेश अय्यरचा आजच्या सामन्यातून डेब्यू
आयपीएल २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी केलेला फलंदाज व्यंकटेश अय्यर आज भारतासाठी पदार्पणाचा टी-२० सामना खेळत आहे.
19:03 November 17
दोन्ही संघ खालील प्रमाणे -
भारत –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड –
मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टिम साऊदी ( कर्णधार), टॉड अॅस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
18:29 November 17
नाणेफेक जिंकून भारताचे प्रथम क्षेत्ररक्षण
जयपूर - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे कर्णधारपद टीम साऊदीकडे आहे. विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. किवींचा नियमित कर्णधार केन विल्यमसन संघात नसल्याने भारतासाठी सामना जिंकण्याची चांगली संधी आहे.