ETV Bharat / sports

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का - ind vs eng test series

भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत होणार आहे. उभय संघातील मालिका ऑगस्ट-सप्टेंबर या काळात होणार आहे. परंतु मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल दुखापतीमुळे सुरूवातीच्या कसोटीला मुकणार असल्याचे वृत्त आहे.

IND vs ENG: shubman-gill-likely-to-be-ruled-out-of-first-test
IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का
author img

By

Published : Jun 30, 2021, 10:38 PM IST

लंडन - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल दुखापतीमुळे सुरुवातीच्या कसोटीत खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत होणार आहे. उभय संघातील मालिका ऑगस्ट-सप्टेंबर या काळात होणार आहे. परंतु मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल दुखापतीमुळे सुरूवातीच्या कसोटीला मुकणार असल्याचे वृत्त आहे.

एका क्रीडा संकेत स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, शुबमन दुखापतीमुळे सुरुवातीच्या कसोटीतून बाहेर पडला आहे. असे असले तरी अद्याप त्याच्या दुखापतीच्या स्वरूपाविषयी काहीही स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शुबमन गिलने सुमार कामगिरी केली. यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. काही माजी खेळाडूंनी शुबमनला मधल्या फळीत खेळवले पाहिजे, असा सल्ला देखील दिला आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. खेळाडू कुटुंबियासह दौऱ्यावर आहेत. सुट्टीच्या काळात ते लंडन वारी करताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा - जुग जुग जीयो ! सोनू सूदने गरजू नेमबाजला पाठवली महागडी रायफल

हेही वाचा - नोवाक जोकोव्हिचची Wimbledon २०२१ मध्ये विजयी घोडदौड कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.