ETV Bharat / sports

SAvsIND 3rd ODI: भारतीय संघासमोर आज 'क्लीन स्वीप' पासून वाचण्याचे आव्हान

author img

By

Published : Jan 23, 2022, 11:07 AM IST

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India v South Africa) संघात सुरु असललेल्या वनडे मालिकेतील आज शेवटचा सामना केपटाऊन येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघासमोर या सामन्यात क्लीन स्वीपपासून वाचण्याचे आव्हान असणार आहे.

SAvsIND
SAvsIND

केपटाऊन : सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्याची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहे. ते दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिका संघाने मालिकेत 2-0ने आघाडी (South Africa leads the series 2-0) घेतली आहे. तसेच या मालिकेतील तिसरा अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. त्यामुळे आज होणारा सामना जिंकून क्लीन स्वीप पासून वाचण्याचा (challenge for India avoid clean sweep)भारतीय संघाचा मानस असणारा आहे. कारण या अगोदरच भारतीय संघाने कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर आता त्या पाठोपाठ वनडे मालिका सुद्धा गमावली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकूण भारत दक्षिण आफ्रिकेचा दौऱ्यातील शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

भारतीय गोलंदाजांना प्रभावी गोलंदाजी करता आली नाही-

वनडे मालिकेतील दोन ही सामन्यात भारतीय गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्यचा विकेट्स घेण्यात मोठ्या प्रामाणत अपयश आले. ज्याचा परिणाम दोन्ही सामन्याच्या निकालावर झाला. रविचंद्रन अश्विन आणि विशेषत: भुवनेश्वर कुमार सारखे अनुभवी गोलंदाज रासी व्हॅन डर डसेन, जानेमन मलान आणि क्विंटन डी कॉक यांसारख्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना आव्हान देऊ शकले नाहीत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर सर्व धोरणात्मक चाली खेळण्यास हताश झाले आहेत. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Head Coach Rahul Dravid) आजच्या सामन्यात जयंत यादव आणि दीपक चहर यांना आजच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतात.

मोठी धावसंख्या उभारण्यात भारतीय फलंदाज अपयशी-

भारतीय संघातील फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात कमी पडले आहेत. यामध्ये कर्णधार केएल राहुल, विराट कोहली आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे. खासकरुन मधल्या फळीतील फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारताचा दोन्ही सामन्यात पराभव झाला. विशेष म्हणजे तळातील फलंदाज शार्दुल ठाकुरने उल्लेखनीय कामगिरी करत संघाला दोन्ही सामन्यात सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले.

भारतीय संघांची गोलदांजी वनडे मालिकेत पूर्णपणे कचखाऊ असल्याचे सिद्ध झाले आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या सुमार गोलंदाजीच्या भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. भारताला पहिल्या सामन्यात 31 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. आजचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना न्यूलॅंड्स येथील केपटाऊन मैदानावर होणार आहे. या सामन्याची नाणेफेक भारतीय प्रमाणवेळेनुसार ठिक दीड वाजता होईल. त्याचबरोबर प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात दोन वाजता होईल. या साम्न्यात भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघात देखील काही प्रमाणात बदल होऊ शकतात.

हेही वाचा: Ipl 2022 Mega Auction: शिखर धवन 2 कोटी, श्रीशांत 50 लाख तर लिलावात कोणत्या खेळाडूची आधारभूत किंमत किती? घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.