अहमदाबाद Rohit Sharma Catch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टॉस हारल्यानंतर भारत प्रथम फलंदाजी करतोय.
रोहितची वेगवान खेळी : कर्णधार रोहित शर्मानं आजच्या सामन्यात पुन्हा एकदा अतिशय वेगवान खेळी खेळली. मात्र त्याला आपला डाव जास्त पुढे नेता आला नाही. तो अर्धशतक पूर्ण करण्याआधीच पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित आऊट होताच संपूर्ण मैदानावर शांतता पसरली होती. या सामन्यात रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी शुभमन गिलसोबत आला होता. मात्र गिल अवघ्या ४ धावा करून स्वस्तात आऊट झाला. यानंतर रोहितनं जबाबदारी स्वीकारली आणि आक्रमक फलंदाजी करत ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार लगावत ४७ धावा ठोकल्या.
ट्रॅव्हिस हेडनं घेतला शानदार झेल : भारताच्या डावातील १० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित बाद झाला. तो ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकी चेंडूला स्टेडियमबाहेर मारण्यासाठी पुढे आला, मात्र चेंडू हवेत उंच गेला आणि ट्रॅव्हिस हेडनं पाठीमागे धावताना एक शानदार झेल घेतला. हेडनं आधी धावत जाऊन बरंच मैदान कव्हर केलं आणि नंतर हवेत उडी मारून रोहितचा आश्चर्यकारक झेल घेतला. त्याच्या या कॅचची आता सर्वत्र चर्चा होते आहे.
विराट कोहलीचं अर्धशतक : अंतिम सामन्यात भारताची सुरुवात अडखळत झाली. टीम इंडियाचे ४ खेळाडू तंबूत परतले आहेत. शुभमन गिल (७ चेंडूत ४ धावा), रोहित शर्मा (३१ चेंडूत ४७ धावा), श्रेयस अय्यर (३ चेंडूत ४ धावा) आणि विराट कोहली (६३ चेंडूत ५४ धावा) बाद झालेत. विराट कोहलीनं या सामन्यात त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ७२वं शतक ठोकलं.
हेही वाचा :