चेन्नई Cricket World Cup 2023 PAK vs SA : गुण तालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा संघ आज चेन्नई इथं खेळल्या जाणाऱ्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तानचा पराभव करण्याचा प्रयत्न करेल. 1999च्या विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. खरं तर, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान 2015 आणि 2019च्या विश्वचषकात दोन वेळा आमनेसामने आले आहेत. त्या दोन्ही सामन्यांत पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलंय.
मागील विश्वचषकांचा इतिहास काय : 2015 च्या विश्वचषकात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेवर 29 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला होता. ऑकलंड, न्यूझीलंडमधील ईडन पार्क इथं पावसानं प्रभावित झालेल्या सामन्यात 232 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या 77 धावांच्या शानदार खेळीनंतरही उच्च दर्जाचा आफ्रिकेचा संघ 202 धावांत गारद झाला होता. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज सोहेल खान, मोहम्मद इरफान, राहत अली आणि वहाब रियाझ यांनी सर्व 10 बळी घेत पाकिस्तान संघाला विजयापर्यंत नेलं हातं. 2019 च्या विश्वचषकात, 309 धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना पाकिस्तानच्या वहाब रियाझनं तीन विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला 259/9 पर्यंत रोखण्यात मदत केली. या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसची 63 धावांची खेळी व्यर्थ गेली. इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावा करता आल्या नाहीत. विश्वचषकात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याची ही दुसरी वेळ होती.
-
Pakistan look to get their #CWC23 campaign back on track against an in-form South Africa unit 🏏#PAKvSA pic.twitter.com/OSLvyymrTr
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pakistan look to get their #CWC23 campaign back on track against an in-form South Africa unit 🏏#PAKvSA pic.twitter.com/OSLvyymrTr
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 27, 2023Pakistan look to get their #CWC23 campaign back on track against an in-form South Africa unit 🏏#PAKvSA pic.twitter.com/OSLvyymrTr
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 27, 2023
यंदाच्या विश्वचषकात दोन्ही संघाची स्थिती काय : दक्षिण आफ्रिकेनं 1999च्या विश्वचषकासह तीन वेळा पाकिस्तानला पराभूत केलंय. 1992, 1996 आणि 1999 च्या विश्वतषकात आफ्रिका संघानं त्यांचा पराभव केलाय. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेनं विश्वचषकात पाकिस्तानविरोधात गेल्या चार सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी केलीय, तर 1992च्या विश्वचषकात त्यांनी फक्त एकदाच पहिल्यांदा फलंदाजी केलीय. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत, दक्षिण आफ्रिकेनं आपल्या धमाकेदार खेळीनं संभाव्य विजेतेपदाचा संघ म्हणून स्वतःला सिद्ध केलंय. त्यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश यांना पराभूत करुन चार सामने जिंकले आहेत. फक्त नेदरलँड्सविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागलाय. तर पाकिस्ताननं स्पर्धेची सुरुवात धमाकेदार केली होती पण भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध सलग तीन सामने त्यांनी गमावले आहेत.
- पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 82 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी आफ्रिकेनं 51 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तान संघानं 30 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णित राहिलाय.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
- पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, फखर जमान/इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ
- दक्षिण आफ्रिका : टेंम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सिन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगी/लिझार्ड विल्यम्स
हेही वाचा :