कोलकाता Cricket World Cup 2023 IND vs SA : भारतीय संघ विश्वचषकातील आठव्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेतील 37 वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. या सामन्यात भारतीय संघची नजर सलग आठव्या विजयावर असेल. या विश्वचषकात भारतीय संघानं एकही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडं, दक्षिण आफ्रिकेनंही दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यांचा एकमेव पराभव नेदरलँडविरुद्ध झालाय. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही अत्यंत धोकादायक आहे. सध्या ते दमदार कामगिरी करत आहेत. गेल्या चारही सामन्यांत त्यांनी विजय मिळवलाय. अशा परिस्थितीत बलाढ्य आफ्रिकन संघासमोर भारतीय खेळाडूंची खरी कसोटी असेल. यामुळं हा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे.
-
Team India's Practice Session at Eden Gardens Stadium❤️#viratkohli pic.twitter.com/4arCEpiw9S
— 𝙒𝙧𝙤𝙜𝙣🥂 (@wrogn_edits) November 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Team India's Practice Session at Eden Gardens Stadium❤️#viratkohli pic.twitter.com/4arCEpiw9S
— 𝙒𝙧𝙤𝙜𝙣🥂 (@wrogn_edits) November 4, 2023Team India's Practice Session at Eden Gardens Stadium❤️#viratkohli pic.twitter.com/4arCEpiw9S
— 𝙒𝙧𝙤𝙜𝙣🥂 (@wrogn_edits) November 4, 2023
दोन्ही संघांची सध्याची परिस्थिती काय : भारतीय संघ सात सामन्यांत सात विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात 14 गुण आहेत. त्याचबरोबर सात सामन्यांत सहा विजयांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे 12 गुण आहेत. हे दोन्ही संघ विश्वचषकात उपांत्या फेरीसाठी पात्र झाले आहेत. कोलकात्यातील सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर असेल. भारतानं जिंकल्यास त्यांचे 16 गुण होतील. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवल्यास त्यांचे 14 गुण होतील. त्यांचा नेट रनरेट (+2.290) भारताच्या नेट रनरेटपेक्षा (+2.102) चांगला आहे.
-
King Kohli in the nets. pic.twitter.com/Pv09WkUCIJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">King Kohli in the nets. pic.twitter.com/Pv09WkUCIJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023King Kohli in the nets. pic.twitter.com/Pv09WkUCIJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड सामने : एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 90 सामने झाले आहेत. त्यात दक्षिण आफ्रिकेचा काही प्रमाणात दबदबा असून त्यांनी 50 जिंकले आहेत. तर भारतानं 37 सामने जिंकले आहेत. तीन सामन्यांत निकाल लागला नाही. विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये पाच सामने झाले आहेत. यात आफ्रिकन संघाला तीन विजय मिळाले आहेत. त्यांनी 1992, 1999 आणि 2011 मध्ये विजय मिळवला आहे. तर उर्वरीत दोन सामन्यात भारतानं बाजी मारलीय. भारतीय संघनं 2015 आणि 2019 विश्वचषकात त्यांचा पराभव केलाय.
-
Captain Rohit is ready to make 8 out of 8 in the World Cup. 🇮🇳 pic.twitter.com/OGeiguC5MU
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Captain Rohit is ready to make 8 out of 8 in the World Cup. 🇮🇳 pic.twitter.com/OGeiguC5MU
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2023Captain Rohit is ready to make 8 out of 8 in the World Cup. 🇮🇳 pic.twitter.com/OGeiguC5MU
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2023
दोन्ही संघ यातून निवडणार :
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, प्रसिध्द कृष्णा
- दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, लिझार्ड विलियम्स