धर्मशाला Cricket World Cup २०२३ : धर्मशालामध्ये आज (२२ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर ४ गडी राखून शानदार विजय मिळवला. या विश्वचषकातील भारताचा हा सलग पाचवा विजय आहे.
-
India go to the top of #CWC23 points table with a brilliant win in Dharamsala 🎉#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/Y62de216yU
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">India go to the top of #CWC23 points table with a brilliant win in Dharamsala 🎉#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/Y62de216yU
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 22, 2023India go to the top of #CWC23 points table with a brilliant win in Dharamsala 🎉#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/Y62de216yU
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 22, 2023
डॅरेल मिशेलचं शानदार शतक : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात अडखळत झाली. फार्मात असलेला सलामीवीर डेव्हॉन कॉनवे शून्यावर परतला. त्याला सिराजनं बाद केलं. दुसरा सलामीवीर यंगही १७ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या रचिन रवींद्र आणि डॅरेल मिशेलनं भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. रवींद्रनं ८७ चेंडूत ७५ धावा कुटल्या. तर मिशेलनं शानदार शतक ठोकलं. त्यानं १२७ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीनं १३० धावा केल्या.
-
Daryl Mitchell made nearly half of New Zealand's runs in Dharamsala 💯#CWC23 #INDvNZ pic.twitter.com/XV7IF8LZVb
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Daryl Mitchell made nearly half of New Zealand's runs in Dharamsala 💯#CWC23 #INDvNZ pic.twitter.com/XV7IF8LZVb
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 22, 2023Daryl Mitchell made nearly half of New Zealand's runs in Dharamsala 💯#CWC23 #INDvNZ pic.twitter.com/XV7IF8LZVb
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 22, 2023
मोहम्मद शमीचे ५ बळी : हे दोघं बाद झाल्यानंतर मात्र न्यूझीलंडचा डाव गडगडला. त्यांच्या खालच्या फळीतील एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकले नाही. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ५० षटकांत २७३ धावा करून बाद झाला. भारताकडून या विश्वचषकात प्रथमच खेळणाऱ्या मोहम्मद शमीनं धारदार गोलंदाजी केली. त्यानं १० षटकांत ५४ धावा देत ५ बळी घेतले. यासह या विश्वचषकात भारताकडून एका सामन्यात ५ विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे.
-
Mohammed Shami's five-wicket haul was instrumental in helping India to their fifth consecutive win in #CWC23 👏
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
It helps him win the @aramco #POTM 🎇#INDvNZ pic.twitter.com/LObyAeL9YW
">Mohammed Shami's five-wicket haul was instrumental in helping India to their fifth consecutive win in #CWC23 👏
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 22, 2023
It helps him win the @aramco #POTM 🎇#INDvNZ pic.twitter.com/LObyAeL9YWMohammed Shami's five-wicket haul was instrumental in helping India to their fifth consecutive win in #CWC23 👏
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 22, 2023
It helps him win the @aramco #POTM 🎇#INDvNZ pic.twitter.com/LObyAeL9YW
भारतीय ओपनर्सची धडाक्यात सुरुवात : न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी धडाक्यानं सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आपल्या नेहमीच्या फॉर्ममध्ये दिसला. त्यानं ४० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं ४६ धावा ठोकल्या. तर शुभमन गिल २६ धावा करून परतला. यानंतर आलेल्या विराट कोहलीनं एका टोकानं किल्ला लढवून ठेवला. त्याला श्रेयस अय्यरनं उत्तम साथ दिली. अय्यर ३३ धावांवर बाद झाल्यानंतर राहुल मैदानात आला. तो २७ धावा करून परतला.
कोहलीचं शतक हुकलं : त्यानंतर विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळत असलेला सूर्यकुमार यादर क्रिजवर आला. मात्र आपल्या पहिल्या सामन्यात तो काही कमाल दाखवू शकला नाही. तो ४ चेंडूत २ धावा करून परतला. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर क्रिजवर आलेल्या रविंद्र जडेजानं कोणतीही रिस्क घेतली नाही. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्यानं ४४ चेंडूत ३९ धावा नोंदवल्या. विराट कोहलीचं या विश्वचषकातील सलग दुसरं शतक अवघ्या ५ धावांनी हुकलं. तो १०४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ९५ धावा करून बाद झाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा :