नवी दिल्ली Cricket World Cup 2023 : विश्वचषकाचा ३८ वा सामना आज नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बांग्लादेशनं श्रीलंकेचा ३ गडी राखून पराभव केला.
असालंकाची झुंजार खेळी : बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला पहिल्याच षटकात धक्का बसला. सलामीवीर परेरा अवघ्या ४ धावांवर तंबूत परतला. निसांका आणि समरविक्रमानं ४१ धावा केल्या. तर कर्णधार कुसल मेंडिसनं ३० चेंडूत १९ धावांचं योगदान दिलं. श्रीलंकेकडून असालंकानं एकाकी झुंज देत शतकी खेळी केली. तो १०५ चेंडूत १०८ धावा करून बाद झाला. बांग्लादेशकडून तन्झीम हसननं ८० चेंडूत ३ बळी घेतले. श्रीलंकेची टीम ४९.३ षटकांत २७९ धावा करून ऑलआऊट झाली.
शकिबची दमदार फलंदाजी : श्रीलंकेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशला तिसऱ्याच षटकात झटका बसला. सलामीवीर तन्झीद हसन ९ धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शांतोनं १०१ चेंडूत ९० धावा केल्या. तर कर्णधार शकिबनं दमदार फलंदाजी करत ६५ चेंडूत ८२ धावा ठोकल्या. बांग्लादेशनं निर्धारित लक्ष्य ४१.१ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात गाठलं. श्रीलंकेकडून मदुशंकानं ६९ धावा देत ३ बळी घेतले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- बांगलादेश : तन्झीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (यष्टिरक्षक), महमुदुल्लाह, शकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, तन्झीम हसन, शोरीफुल इस्लाम
- श्रीलंका : पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार, यष्टिरक्षक), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, दुष्मंथा चमीरा, महिश थीक्षणा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 BAN vs SL : प्रतिष्ठेसाठी श्रीलंका-बांगलादेश खेळणार; मात्र 'या' कारणामुळं रद्द होऊ शकतो सामना
- Virat Kohli Equals Sachin Record : 'देवाशी' बरोबरी केल्यानंतर विराट भावूक होत म्हणाला, 'हा खूप मोठा सन्मान'
- Prasidh Krishna : प्रसिद्ध कृष्णा लहानपणापासूनचं आहे प्रतिभावान गोलंदाज, विश्वचषकात निवड होणं अभिमानास्पद