ETV Bharat / sports

Threats to Wriddhiman Saha : सर्व आवश्यक माहिती बीसीसीआयच्या समितीला दिली - रिद्धिमान साहा

author img

By

Published : Mar 6, 2022, 11:13 AM IST

रवी शास्त्री, पार्थिव पटेल, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग या माजी खेळाडूंनी पत्रकारावर टीका केली होती. त्यानंतर रिद्धिमान साहाला धमकी ( Threats to Wriddhiman Saha ) दिलेल्या प्रकरणाने जोर धरला.

Saha
Saha

नई दिल्ली: मागील काही दिवसापूर्वी रिद्धिमान साहाने एका पत्रकाराला मुलाखत न दिल्याबद्दल साहाला कथितपणे 'धमकी' मिळाली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीसीसीआयने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीची बैठक ( Meeting of three member committee ) झाली. या बैठकीनंतर, यष्टीरक्षक फलंदाजाने शनिवारी सांगितले की, त्याने सर्व आवश्यक माहिती समितीला दिली आहे.

37 वर्षीय रिद्धिमान साहाला श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर एका पत्रकाराने साहाला धमकी दिली होती. या धमकी दिलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट ( Screenshot of a threatening message ) साहाने ट्विट केले होते. त्यानंतर या प्रकरणाने जोर धरायला सुरुवात केली.ज्यामध्ये रवी शास्त्री, पार्थिव पटेल, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग या माजी खेळाडूंनी पत्रकारावर टीका केली, त्यानंतर या प्रकरणाने खुपच जोर धरला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( Board of Control for Cricket in India ) नंतर या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ आणि सर्वोच्च परिषदेचे सदस्य प्रभातेज भाटिया यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय समिती स्थापन केली.

साहा म्हणाला, "मला जे माहीत आहे ते मी समितीला सांगितले आहे. जे काही तपशील मी त्यांच्यासोबत शेअर केले आहेत. मी आत्ताच तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही. बीसीसीआयने मला बाहेर काहीही बोलू नको, असे सांगितले आहे."

साहा यांने समितीसमोर पत्रकाराचे नाव जाहीर केले की नाही, हे पाहणे बाकी आहे. कारण क्रिकेटपटूने यापूर्वीच नाव जाहीर करणार नसल्याचे सांगितले होते. कारण त्यामुळे पत्रकाराच्या कारकिर्दीला हानी पोहोचू शकते.

त्याने ट्विट केले होते की, "कोणाचेही करिअर संपवण्याइतपत आणि कोणाचेही नुकसान करणे माझ्या स्वभावात नाही. त्यामुळे मानवतावादी आधारावर मी सध्या त्याच्या कुटुंबाचा विचार करून नाव जाहीर करत नाही. पण अशी कोणती पुनरावृत्ती होत असल्यास. होय, मी मागे हटणार नाही."

40 कसोटी सामने खेळलेल्या साहाला भारतीय संघ व्यवस्थापनाने आधीच सांगितले आहे, की त्यांनी युवा यष्टिरक्षक फलंदाज तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघात ( Test team against Sri Lanka ) या अनुभवी खेळाडूकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच मुख्य यष्टिरक्षक ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून केएस भरतचा श्रीलंका मालिकेसाठी कसोटी संघात समावेश करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.