मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियात निवडलेल्या आणि सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार्या मर्यादित षटकांच्या खेळाडूंना १ मार्च रोजी अहमदाबाद येथे येण्यास सांगितले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी त्यांना बोलावण्यात आले आहे.
टी-२० मालिकेसाठी शिखर धवन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल तेवतिया आणि भुवनेश्वर कुमार यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. ही मालिका १२ मार्चपासून सुरू होईल. हे सर्व खेळाडू सध्या विजय हजारे ट्रॉफी खेळत आहेत आणि संबंधित राज्य संघाच्या बायो बबलमध्ये आहेत.
हेही वाचा - हार्दिक, विराटपाठोपाठ टीम इंडियाचा अजून एक खेळाडू झाला 'बाबा'
डीडीसीए;च्या अधिकाऱ्याने सांगितले की, शिखरसह इतर खेळाडूंनाही १ मार्च रोजी अहमदाबादला जावे लागेल. आम्हाला माहित आहे की, सर्व मर्यादित षटकांच्या खेळाडूंनी फॉर्ममध्ये रहाण्यासाठी किमान दोन किंवा तीन सामने खेळावे लागतील. अलीकडेच बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी १९ सदस्यीय संघाची घोषणा केली.
टी-२० संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक) युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी.नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.