बर्मिंगहॅम: शनिवारी भारताने दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात यजमानांवर 49 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एजबॅस्टन येथील भारतीय ड्रेसिंग रूमला भेट ( MS Dhoni Meets Team India ) दिली. या क्रिकेटरला नुकतेच विम्बल्डनमध्ये सुनील गावसकरसोबत पाहिले गेले होते.
-
Always all ears when the great @msdhoni talks! 👍 👍#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/YKQS8taVcH
— BCCI (@BCCI) July 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Always all ears when the great @msdhoni talks! 👍 👍#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/YKQS8taVcH
— BCCI (@BCCI) July 9, 2022Always all ears when the great @msdhoni talks! 👍 👍#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/YKQS8taVcH
— BCCI (@BCCI) July 9, 2022
धोनीने भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमला भेट दिल्यानंतर त्याने यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनसह इतर खेळाडूंशी संवाद ( Dhoni interacted with Ishan Kishan ) साधला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इशानसोबत धोनीच्या संभाषणाची फोटो आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर पोस्ट केली आहेत.जो दुसऱ्या T20 मध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता.
चेन्नई सुपर किंग्जमध्ये धोनीचा सहकारी असलेल्या रवींद्र जडेजाच्या शानदार नाबाद 46 ( Ravindra Jadeja notout 46 runs ) धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 170/8 असे आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. त्यानंतर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील खेळणारा इंग्लंडचा संघ 17 षटकांत 121 धावांत गारद झाला. ज्यामुळे भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
7 जुलै रोजी धोनीचा 41 वा वाढदिवस होता, त्याच्या अगोदरपासून धोनी भारता बाहेर आहे. धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. 2007 टी20 विश्वचषक, 2011 क्रिकेट विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने संघाचे नेतृत्व केले होते. तसेच त्याने 2009 मध्ये भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर नेले. देशांतर्गत स्तरावर, त्याने चेन्नई सुपर किंग्सचे दोन चॅम्पियन्स लीग, 2010 आणि 2014 मध्ये T20 विजेतेपदांसह 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे.
हेही वाचा - Ind Vs Eng 3rd T20 : भारत आणि इंग्लंड संघात आज तिसरा सामना, इंग्लंडसमोर क्लीन स्वीप वाचवण्याचे आव्हान