मुंबई : न्यूझीलंडचा क्रिकेट संघ त्यांचा सातत्यपणा आणि कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीसाठी ओळखला जातो. त्यामुळेच आयसीसीच्या जवळपास प्रत्येक मोठ्या स्पर्धेत किवीज बाद फेरीत खेळताना दिसतात. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ५ ऑक्टोबरला न्यूझीलंडचा पहिला सामना इंग्लंडसोबत होणार आहे. या सामन्यापूर्वी, न्यूझीलंडच्या अशा पाच खेळाडूंकडे नजर टाकूया ज्यांच्याकडून या विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.
-
New Zealand's 15-player group is in for @CricketWorldCup 2023!
— ICC (@ICC) September 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
How will Kane Williamson's men fare in India?
More 👉 https://t.co/LRUPUQYWkS pic.twitter.com/rPtTvUoEaq
">New Zealand's 15-player group is in for @CricketWorldCup 2023!
— ICC (@ICC) September 11, 2023
How will Kane Williamson's men fare in India?
More 👉 https://t.co/LRUPUQYWkS pic.twitter.com/rPtTvUoEaqNew Zealand's 15-player group is in for @CricketWorldCup 2023!
— ICC (@ICC) September 11, 2023
How will Kane Williamson's men fare in India?
More 👉 https://t.co/LRUPUQYWkS pic.twitter.com/rPtTvUoEaq
- केन विल्यमसन : विराट कोहली, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथसोबत 'फॅब फोर'चा भाग असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या विश्वचषकात त्याच्या संघासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू असेल. तो त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीसाठी ओळखला जातो. विल्यमसन संघात अँकरची भूमिका बजावतो. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या विल्यमसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. तसेच तो आयपीएलमध्ये देखील अनेक वर्ष खेळला आहे. त्यामुळे त्याला भारतीय खेळपट्टीची चांगली जाण आहे. या विश्वचषकात त्यानं दुखापतीनंतर पुनरागमन केलंय. एकदिवसीय क्रिकेटमधला विल्यमसनचा रेकॉर्ड सांगतो की तो संघासाठी किती महत्त्वाचा आहे. त्यानं १६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.८५ ची उत्कृष्ट सरासरी आणि ८०.९९ च्या स्ट्राइक रेटनं ६५५५ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं १३ शतकं आणि ४२ अर्धशतकं झळकवले आहेत.
- ईश सोढी : लेगस्पिनर ईश सोढी या विश्वचषकात संघासाठी एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो. स्पिनर्ससाठी अनुकूल असलेल्या भारतीय खेळपट्ट्या लक्षात घेऊन मधल्या षटकांमध्ये तो कर्णधारासाठी गो-टू गोलंदाज असेल. सोढी त्याच्या फ्लाइट चेंडूंसाठी ओळखला जातो. तसेच तो गुगली देखील टाकू शकतो, ज्याचा वापर तो वेळोवेळी सरप्राईज डिलिव्हरी म्हणून करतो. यासह त्याच्याकडे टॉप स्पिन, फ्लिपर आणि क्लासिक लेग ब्रेक हे पर्याय देखील आहेत. आतापर्यंत त्यानं न्यूझीलंडसाठी ४९ एकदिवसीय सामन्यांच्या ४६ डावांमध्ये ६१ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याची इकॉनॉमी ५.४६ एवढी आहे. ३९ धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
- ट्रेंट बोल्ट : डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पॉवर प्ले मध्ये विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. तसेच तो डेथ ओव्हर्समध्येही त्याच्या वेगवान यॉर्करनं कहर करतो. कित्येक स्टार फलंदाज बोल्टच्या स्विंग गोलंदाजीपुढे गुडघे टेकतात. बोल्टला भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याचाही भरपूर अनुभव आहे. २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्धचा त्याचा स्पेल कोणताही भारतीय विसरू शकत नाही. बोल्टनं न्यूझीलंडसाठी १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४.९४ च्या उत्कृष्ट इकॉनॉमीसह १९७ विकेट घेतल्या आहेत.
- मिचेल सँटनर : न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाजी मिचेल सँटनर आपल्या गोलंदाजीनं एकहाती सामना संघाच्या बाजूनं वळवू शकतो. तसेच तो फलंदाजीतही काही महत्त्वपूर्ण खेळी खेळू शकतो. भारतीय खेळपट्ट्यांवर सँटनर अधिक धोकादायक ठरेल. तसेच त्याला भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याचा बराच अनुभव आहे. सॅन्टनरनं न्यूझीलंडसाठी ९४ सामन्यांत ४.८७ च्या उत्कृष्ट इकॉनॉमीसह ९१ बळी घेतले आहेत. तसेच त्यानं ३ अर्धशतकांसह १२५२ धावा केल्या आहेत.
- डेव्हॉन कॉनवे : डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे सहसा डावाची सुरुवात करतो. तो अत्यंत आक्रमक फलंदाजी करतो. तो फिरकी गोलंदाजी उत्तमरित्या खेळतो. कॉनवेनं आयपीएलमध्ये चेन्नईसाठी अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत. आतापर्यंत त्यानं न्यूझीलंडसाठी २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ शतकं आणि ३ अर्धशतकांसह ८७४ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ४६ तर स्ट्राइक रेट ८५.५१ राहिला आहे.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : बांग्लादेशच्या 'या' ५ खेळाडूंना अजिबात हलक्यात घेऊ नका, जाणून घ्या कोण आहेत हे खेळाडू
- Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचे पाच मॅचविनर खेळाडू 'या' विश्वचषकात करू शकतात दमदार कामगिरी
- Cricket World Cup 2023 : एकेकाळी 'यांनी' केलं होतं जागतिक क्रिकेटवर राज्य, वाचा क्रिकेटच्या पडझडीची कॅरेबियन कथा