ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ IND vs BAN : दुखापतीमुळं हार्दिक पंड्या मैदानाबाहेर; विराट कोहलीनं पूर्ण केलं षटक - हार्दिक पंड्याच्या पायाला दुखापत

Cricket World Cup २०२३ IND vs BAN : भारतीय क्रिकेट संघाचा भरवशाचा खेळाडू हार्दिक पंड्याला गोलंदाजी करताना दुखापत झाली. टीमच्या फिजिओ थेरपिस्टनं तपासणी केल्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार, हार्दिकला दुखापतीमुळं मैदान सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. सामन्याच्या नवव्या षटकादरम्यान हा प्रकार घडला. हार्दिक मैदानाबाहेर गेल्यानंतर त्याच्या षटकातले उरलेले तीन चेंडू विराट कोहलीने टाकले.

Cricket World Cup 2023 IND vs BAN
Cricket World Cup 2023 IND vs BAN
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 6:21 PM IST

Updated : Oct 20, 2023, 12:03 PM IST

पुणे Cricket World Cup २०२३ IND Vs BAN : वर्ल्ड कपच्या भारत विरुद्ध बांग्लादेश क्रिकेट सामन्यात भारतीय क्रीडाप्रेमींच्या काळजाचे ठोके वाढवणारी घटना घडलीय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात डावाचं नववं तसंच स्वतःचं पहिलं षटक टाकताना हार्दिक पंड्याचा पाय मुरगळला. त्यामुळं हार्दिकच्या पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळं त्याला मैदानाबाहेर जावं लागलं.

हार्दिक पंड्याच्या पायाला दुखापत : नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बांग्लादेशचा फलंदाज लिटन दासनं मारलेला सुरेख स्ट्रेटड्राइव्ह हार्दिक पंड्यांनं फॉलो थ्रूमध्ये उजव्या पायानं अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्नात पंड्या घसरला. चेंडू पायाखालून गेल्यामुळं अष्टपैलू खेळाडू जमिनीवर पडला. मात्र उभा राहिल्यानंतर त्याला दुखण्याची तीव्रता जाणवू लागली. दुखणं कमी करण्यासाठी पायाला पट्टा लावण्याच्या प्रक्रियेत बराच उशीर झाला. त्यानंतर हार्दिकला खेळ अर्धवट सोडून फिजिओ थेरपिस्टबरोबर मैदानाबाहेर जाण्यावाचून पर्याय राहिला नाही.

'किंग' कोहलीची गोलंदाजी : हार्दिकची अर्धवट राहिलेली गोलंदाजी पूर्ण करण्यासाठी स्टार फलंदाज, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनं बाह्या सरसावल्या. विराटनं टाकलेल्या तीन चेंडूंमध्ये बांग्लादेशच्या फलंदाजांना दोनच धावा घेता आल्या. हार्दिकनं सुरुवातीच्या तीन चेंडूमध्ये आठ धावा दिल्या. दरम्यान, हार्दिक पंड्याच्या जागी विराट कोहली आला, हे पाहिल्यानंतर क्रीडाप्रेमींनी एकच जल्लोष केला.

हार्दिकसाठी चाहत्यांच्या 'हार्दिक' शुभेच्छा : हार्दिकच्या जागी बदली खेळाडू म्हणून आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. हार्दिकची दुखापत कितपत गंभीर आहे, हे तूर्त कळलेलं नाही. तो हा सामना खेळेल, याबाबतही साशंकता आहे. हार्दिक पंड्याला दुखापत झालेली पाहून सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित क्रीडाप्रेमी चुकचुकले. हार्दिकच्या पायाची दुखापत गंभीर असू नये, यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करताना दिसले.

हेही वाचा -

  1. Mushfiqur Rahim Father : भारत-बांगलादेश सामन्याबद्दल मुशफिकूर रहीमच्या वडिलांची EXCLUSIVE मुलाखत; म्हणाले...
  2. Virat Kohli Cutout in Kolhapur : कोल्हापुरात विश्वचषकाचा फिव्हर; चाहत्यांनी उभारला विराट कोहलीचा पंधरा फुट कटआउट, पहा व्हिडिओ
  3. Cricket World Cup 2023 : गुणतालिकेत कोणता संघ अव्वल? तर सर्वाधिक धावा आणि बळी कोणाच्या नावावर, वाचा सविस्तर

Last Updated : Oct 20, 2023, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.