ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : शुभमन गिलबाबत कर्णधार रोहित शर्माचं 'मोठं' वक्तव्य

भारताचा पहिला सामना रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्याआधी भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलची तब्येत बरी नसल्याच्या बातम्या येत आहेत. यावर कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलंय.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 8:02 PM IST

चेन्नई : रविवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया समाना खेळला जाणार आहे. मात्र, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी सलामीवीर शुभमन गिल आजारी पडलाय. याबाबत भारताचा कर्णधार रोहित शर्मानं वक्तव्य केलंय. शुभमन गिलला आजारातून बरं होण्याची प्रत्येक संधी संघ देईल. शुभमन गिल अजूनही संघाचा भाग आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या समान्यातून वगळण्यात आलेलं नाहीये, असं रोहित शर्मा म्हणाला.

गिलला डेंग्यू ची लागण : संघ चेन्नईत आल्यापासून गिलनं संघाच्या सराव सत्रात भाग घेतला नाही. शुक्रवारी गिलला डेंग्यू झाल्याचं समोर आलं होतं. सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, सर्वजण तंदुरुस्त आहेत, पण गिल शंभर टक्के बरा नाहीये. तो अजारी जरी असला तरी, संघात कोणतीही कमी नाही. त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळं आम्ही दररोज त्याच्यावर नजर ठेवत आहोत. आम्ही त्याला सावरण्याची प्रत्येक संधी देणार आहेत. त्याला बरं वाटत असल्यास नक्की विचार केला जाईल असं शर्मा म्हणाला. गिल भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये धावसंख्येच्या यादीत गिल आघाडीवर आहे. त्यानं 20 सामन्यांमध्ये 72.35 च्या सरासरीनं, 105.03 च्या स्ट्राइक रेटनं 1230 धावा केल्या आहेत.

गिल लवकरच बरा होईल : पुढे बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, गिल बरा व्हावा अशी, माझी इच्छा आहे. एक कर्णधार म्हणून मी, असा विचार करत नाही की गिलनं खेळायलाच हवं. त्यानं बरं व्हावं, संघातील कोणीही आजारी पडू नये असं माला वाटतं. गिल तरुण युवा खेळाडू आहे, त्याचं शरीर तंदुरुस्त आहे, तो लवकरच बरा होईल अशी अपेक्षा आहे.

इशान किशनला संघात स्थान? : गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारचा सामना खेळू शकला नाही, तर जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलामीवीर म्हणून सलग तीन अर्धशतकं झळकावणाऱ्या इशान किशनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत आघाडीवर राहण्याचा पर्याय म्हणून समोर येईल. दुसरा पर्याय म्हणजे यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल, या फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी मधल्या फळीचा मुख्य आधार आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं, की वैद्यकीय संघ सामन्याच्या दिवशी गिलच्या सहभागावर निर्णय घेईल. 1983-2011 मध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर भारत तिसरा पुरुष एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वी 1987, 1996, 2011 मध्ये तीन वेळा सह-यजमानपद भूषवल्यानंतर स्पर्धेच्या तेराव्या आवृत्तीत भारत हा एकमेव यजमान संघ असेल.

संघात आत्मविश्वास : प्रत्येक मोठी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघाचा मूड चांगला असतो. आम्ही या स्पर्धेत खरोखरच चांगली तयारी करून आलो आहोत. त्यामुळं, आम्ही कौशल्याच्या बाबतीत खूप आत्मविश्वासानं इतर संघाच्या पुढं आहोत. आम्ही आता सामन्याची वाट पाहत असल्याचं कर्णधार रोहित शर्मान सांगितलंय.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : भारतच विश्वचषकाचा दावेदार, 'या' युवा खेळाडूची विश्वचषकात मोठी कामगिरी
  2. World Cup २०२३ : शुभमन गिलच्या जागी 'या' खेळाडूला मिळणार संधी? राहुल द्रविड यांचा गिलबाबत मोठा खुलासा
  3. Asian Games २०२३ : आशियाई गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक, उपमुख्यमंत्र्यांनी साधला 'चँपियन'च्या आई-वडिलांशी संवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.