ETV Bharat / sports

CRICKET WORLDCUP : श्रीलंकेसमोर पाकिस्तानचे आव्हान; दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस

author img

By

Published : Jun 7, 2019, 12:48 PM IST

Updated : Jun 7, 2019, 1:28 PM IST

उभय संघाना पहिल्या सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र, दुसऱया सामन्यामध्ये दोन्ही संघांनी विजयी पताका फडकावली होती.

पाकिस्तान - श्रीलंका लढत

नॉटिंगहॅम - आज विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात सलग दुसऱ्या विजयासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका भिडणार आहेत. उभय संघाना पहिल्या सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र, दुसऱया सामन्यामध्ये दोन्ही संघांनी विजयी पताका फडकावली होती. आज होणाऱ्या सामन्यात विश्वकपचा इतिहास पाहता पाकिस्तानचे पारडे जड मानले जात आहे. हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल.

श्रीलंकेने भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानवर ३४ धावांनी विजय मिळवला असला तरी फलंदाजांची कामगिरी म्हणावी तितकी चांगली झालेली नाही. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 50 षटकांमध्ये 348 धावांचा डोंगर उभा करुन विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिला विजय मिळवला होता.

पाकिस्तानचा संघ -
सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक आणि वहाब रियाज.

श्रीलंकेचा संघ -
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, कुशल परेरा, धनंजय डिसेल्वा, कुशल मेंडिस, आयसुरु उडाना, मिलींदा सिरिवर्धना, अविष्का फर्नांडो, जीवन मेंडिस, लाहिरु थिरिमन्ने, जेफ्री वंडरसे, नुवान प्रदीप, सुरांगा लकमल

Intro:Body:

spo 04

Conclusion:
Last Updated : Jun 7, 2019, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.