नवी दिल्ली - पाकिस्तानचा सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला क्रिकेटप्रेमींनी ट्विटरवर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी गमतीशीर ट्विटर करत पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची फिरकी घेतली आहे.
पाकिस्तानने विश्वकरंडक स्पर्धेच्या अनुषंगाने भारतीय हवाई दलाचे अधिकारी अभिनंदन यांच्याबद्दल अवमानकारक जाहिरात केली होती. हा संदर्भ घेत काहीजणांनी रोहित शर्माला अभिनंदनच्या रुपात दाखवून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे.

ट्विटरवर क्रिकेट प्रेमींनी वेगवेगळ्या ट्विटमधून पाकिस्तान क्रिकेट मंडळाला लक्ष्य केले आहे. अशा एका ट्विटमध्ये पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार सरफराज विराट कोहलीला विचारतो, प्रत्येकवेळी तुम्ही कसे जिंकता ? त्यावर विराट म्हणतो, मला वाटते, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. अभिनंदन यांना पाकिस्तानच्या सैन्यदलाने ताब्यात घेतल्यानंतर हेच उत्तर त्यांनी दिले होते. त्याविषयावरून खिल्ली उडविणारी जाहिरात पाकिस्तानमधील चहा उत्पादक कंपनीने केली होती.

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज कोहलीबरोबर विश्वकरंडक घेतलेल्या फोटोत 'फादर्स डे'ची तुलना ही भारत व पाकिस्तान सामन्याबरोबर केली आहे.
पाकिस्तानला विश्वकरंडक जिंकायचा असेल तर त्यांना युगांडा,रशिया, कॅनडा एवढेच नव्हेतर व्हॅटेकिन सिटी असे स्पर्धक असायला हवेत. तरच ते विश्वकरंडक जिंकू शकतील, अशी खिल्ली एका वापरकर्त्याने उडविली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली होती, याची आठवण करून देत एका वापरकर्त्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अभिनंदन केले आहे. सलग सातव्या विश्वकरडंक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केला. अबकी 'बार सातवी बार' असे म्हणत 'बाप बाप होता' आहे, असे वापरकर्त्याने म्हटले आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद हा जांभई देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याचा संदर्भ घेत एका वापरकर्त्याने सरफराज अंथरुणात झोपलेला दाखविला आहे. जोपर्यंत हा खेळाडू आहे, तोपर्यंत काही खरे नाही, अशा अर्थाने ट्विट केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारताकडून पराभव झाल्याने पाकिस्तानात टीव्ही फोडण्यात येत असल्याचे स्क्रीनशॉट्स काही जणांनी पोस्ट केले आहेत.