लॉर्डस - अतिशय रंगतदार आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेच्या फायनल सामन्यात इंग्लडने बाजी मारली. न्यूझीलंडने तोडीस-तोड खेळ केला मात्र, चौकांराच्या जोरावर इंग्लंडने विजय मिळवला. एक-एक धाव महत्त्वाची असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या काही चुका त्यांना चांगल्याच महागात पडल्या. यामध्ये सलामीवीर मार्टीन गुप्टीलने वाया घालवलेल्या रिव्हीव्यूची चांगलीच चर्चा आहे.
हेही वाचा - सुपर ओव्हर टाय झाली, मग इंग्लड जिंकलाच कसा?
तिसऱ्या षटकात ख्रिस व्होक्सच्या गोलंदाजीवर मार्टीन गुप्टील पायचित झाला. त्यावेळी रिव्हीव्यू घेण्याची आवश्यकता नव्हती. कारण चेंडू सरळ-सरळ मधल्या यष्टीवर जात असल्याचे दिसत होते. मात्र, तेथे रिव्हीव्यू घेतला गेला आणि तिसऱ्या पंचानी गुप्टीलला बाद घोषित केले. त्यामुळे न्यूझीलंडकडील रिव्हीव्यू संपले. याचा मोठा तोटा न्यूझीलंडला रॉस टेलर बाद झाला तेव्हा झाला. अनुभवी आणि भारताविरुद्ध महत्त्वाची खेळी करणाऱ्या टेलरला मार्क वूडने पायचित केले. वूडचा चेंडू यष्ट्यांवरून जात असल्याचे बॉल ट्रॅकींगमधून दिसत होते. पण, रिव्हीव्यू शिल्लक नसल्याने टेलरला मैदान सोडावे लागले.
-
Seems a long time ago, but England's bowlers were on song to keep New Zealand in check in the morning 👀#WeAreEngland | #CWC19 | #CWC19Final pic.twitter.com/48DQ5PvOHJ
— ICC (@ICC) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Seems a long time ago, but England's bowlers were on song to keep New Zealand in check in the morning 👀#WeAreEngland | #CWC19 | #CWC19Final pic.twitter.com/48DQ5PvOHJ
— ICC (@ICC) July 14, 2019Seems a long time ago, but England's bowlers were on song to keep New Zealand in check in the morning 👀#WeAreEngland | #CWC19 | #CWC19Final pic.twitter.com/48DQ5PvOHJ
— ICC (@ICC) July 14, 2019
शेवटच्या थरारक षटकात 'ओव्हर थ्रो'चा न्यूझीलंडला मोठा फटका बसला. षटकातील चौथ्या चेंडूवर ब्रेन स्टोक्सने जोरदार फटका मारला. सीमारेषेजवळ चेंडू अडवल्याने त्याला केवळ दोन धावा मिळाल्या, मात्र चेंडू यष्टीला लागून सीमारेषा पार झाला. त्यामुळे इंग्लंडला दोनच्या ठिकाणी सहा धावा मिळाल्या. या चार धावा जाणे, न्यूझीलंडला खूप महागात पडले.
शेवटच्या षटकातील थरार
इंग्लडला विजयासाठी शेवटच्या षटकात १५ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर एकही धाव निघू शकली नाही. दुसरा चेंडूही वाया गेला. ट्रेन्ट बोल्टने ऑफ साइडच्या बाहेर टाकलेला चेंडू स्टोक्सला खेळता आला नाही. तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सने शानदार षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर स्टोक्सने मोठा फटका मारला मात्र, सीमारेषेवर तो अडवला, तितक्यात स्टोक्सने दोन धावा काढल्या मात्र, या चेंडूवर ओव्हर थ्रो झाला आणि आणखीन ४ धावा इंग्लंडला मिळाल्या. त्यानंतर पाचव्या चेंडूवर स्टोक्सने दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आदिल राशीद धावबाद झाला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर इंग्लडला विजयासाठी २ धावांची गरज होती. मात्र, शेवटच्या चेंडूवर स्टोक्सला केवळ एकच धाव घेता आली, त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.