लंडन - आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने एक निर्धार केला आहे. या विश्वकरंडक स्पर्धेत आणखी एक हॅट्ट्रिक झाली तर, ती माझ्यासाठी स्पेशल ठरेल अशी प्रतिक्रिया मलिंगाने व्यक्त केलीय. त्यामुळे त्याने फलंदाजांना जणू सावधानतेचा इशाराच दिला आहे.
मलिंगा म्हणाला की, 'मला इंग्लंडमध्ये खेळायला आवडते कारण तुम्हाला इथे प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. इंग्लंडच्या हवामानात नेहमी चढउतार येत असतो. त्यामुळे एक गोलंदाज म्हणून हवामान हीच तुमची खरी कसोटी ठरते.'
'यॉर्कर स्पेशालिस्ट' लसिथ मलिंगाने 2007 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार चेंडूत चार विकेट घेत हॅट्ट्रिक साजरी केली होती.
३५ वर्षीय लसिथ मलिंगा सध्या भन्नाट फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये त्याने अखेरच्या षटकात उत्कृष्ठ गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला होता. आयपीएलमध्ये मलिंगाने 16 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.