ETV Bharat / sports

CRICKET WORLDCUP: साहेबांचा वेस्ट इंडीजवर ८ विकेट्सनी दिमाखदार विजय

वेस्ट इंडीजचा संघ ४४.४ षटकांत सर्वबाद २१२ धावाच काढू शकला. इंग्लंडने अवघ्या ३३.१ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात २१३ धावांचे आव्हान पार केले. शतकी खेळीसाठी जो रुटला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

इंग्लंडचे खेळाडू जल्लोष करताना
author img

By

Published : Jun 14, 2019, 9:57 PM IST

साउथहॅम्पटन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत आज यजमान इंग्लंडसमोर बेभरवशी वेस्ट इंडिजचे आव्हान होते. इंग्लंडने एकतर्फी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी विजय मिळवला. शतकी खेळीसाठी जो रुटला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

इंग्लंडचा कर्णधार ओएन मोर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना इंग्लंडच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. विंडीजची सुरुवात खराब झाली. इविन लुईस अवघ्या २ धावा काढून बाद झाला. सर्वांच्या नजरा असलेला फलंदाज ख्रिस गेल ३६ धावा काढून बाद झाला. शाई होपही ३० चेंडूत ११ धावांची संथ खेळी करुन बाद झाला. त्यानंतर निकोलस पुरन ६३ धावा आणि शिमरॉन हेटमायरने ३९ धावा करताना संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघे बाद झाल्यानंतर तळातील फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर टिकले नाहीत. आक्रमक फलंदाज आंद्रे रसेलही २१ धावा काढून बाद झाला. विंडीजचा संघ ४४.४ षटकांत सर्वबाद २१२ धावाच काढू शकला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर, जो रुटनेही फिरकी गोलंदीजीवर २ गडी बाद केले.

इंग्लंडने २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ९५ धावांची आक्रमक सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो ४५ धावा काढून बाद झाला. यानंतर, इंग्लंडने ख्रिस वोक्सला फलंदाजीसाठी पाठवले. त्यानेही निराश न करता ४० धावांची खेळी केली. तर, सलामीला आलेला जो रुटने नाबाद १०० धावा करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडने अवघ्या ३३.१ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात २१३ धावांचे आव्हान पार केले. वेस्ट इंडिजकडून शॅनॉन गॅब्रियलने २ गडी बाद केले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.