मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचा धुव्वा उडवत आपला विजयरथ चालूच ठेवला आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजला १२५ धावांनी नमवत विजय मिळवला. २६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ १४३ धावांवर बाद झाला. सामन्यात महेंद्रसिंह धोनीने ५६ धावांची संयमी खेळी केली. शिवाय, यष्टीरक्षण करताना एक सुरेख झेलही माहीने टिपला आहे.
-
Virat Kohli's slashing four off Oshane Thomas?
— ICC (@ICC) June 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
MS Dhoni's 89-metre maximum?
The #TeamIndia wicket-keeper's incredible diving catch?
Which gets your vote for the @Nissan Play of the Day?
Have your say here: https://t.co/7SsrSjNv2c pic.twitter.com/pvvG2z6w3b
">Virat Kohli's slashing four off Oshane Thomas?
— ICC (@ICC) June 27, 2019
MS Dhoni's 89-metre maximum?
The #TeamIndia wicket-keeper's incredible diving catch?
Which gets your vote for the @Nissan Play of the Day?
Have your say here: https://t.co/7SsrSjNv2c pic.twitter.com/pvvG2z6w3bVirat Kohli's slashing four off Oshane Thomas?
— ICC (@ICC) June 27, 2019
MS Dhoni's 89-metre maximum?
The #TeamIndia wicket-keeper's incredible diving catch?
Which gets your vote for the @Nissan Play of the Day?
Have your say here: https://t.co/7SsrSjNv2c pic.twitter.com/pvvG2z6w3b
विंडीजचा संघ फलंदाजी करताना २७ व्या षटकात धोनीने हा झेल घेतला. या षटकात बुमराह गोलंदाजी करत असताना ब्रेथवेटच्या बॅटची कड लागून चेंडू स्लीपच्या दिशेने जात होता. धोनीने हा चेंडू हवेत सूर मारून टिपला. सोशल मिडियावर धोनीच्या या झेलची प्रचंड चर्चा होत आहे.
या सामन्यात विंडीजकडून केमार रोचने ३, शेल्डन कॉट्रेल आणि जेसन होल्डर याने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर, अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात ४ बळी घेतलेल्या मोहम्मद शमीने याही सामन्यात ४ बळी मिळवले. तर बुमराह आणि चहलने प्रत्येकी २ बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक बळी मिळवला.