नवी दिल्ली - क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरने २००३ च्या विश्वकरंडक स्पर्धेत ६७३ धावा केल्या होत्या. या आतापर्यंतच्या विश्वकरंडक स्पर्धेतील सर्वाधिक धावा आहेत. हा विक्रम करताना सचिनने 'गोल्डन बॅट' जिंकली होती. मात्र, या विक्रमाला दोन फलंदाजांकडून धोका आहे. कारण, यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत हा विक्रम मोडला जाऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाचे धडाकेबाद फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहेत. डेव्हिड वॉर्नर ५०० धावांसह हा सर्वाधिक फलंदाजांच्या यादीत पहिल्या तर कर्णधार अॅरॉन फिंच ४९६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सचिनचा विक्रम हे दोन फलंदाज मोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लडच्या सामन्यात यजमान इंग्लडचा ऑस्ट्रेलियाने ६४ धावांनी पराभव केला. कर्णधार अॅरोन फिंचच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लडसमोर २८५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग इंग्लंडला करता आला नाही. त्यांचा सुपूर्ण संघ ४४.४ षटकांत केवळ २२१ धावाच करू शकला.