मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत आज अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर स्पर्धेबाहेर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना रंगणार असून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखण्यावर ऑस्ट्रेलिया संघाचा भर असणार आहे. हा सामना संधाकाळी ६ वाजता सुरू होईल.
ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तुफान फॉर्मात आहेत. त्यामुळे फलंदाजीची संपूर्ण मदार या दोघांवर असणार आहे. तर, विरोधी फलंदाजांमध्ये धडकी भरवणाऱ्या मिचेल स्टार्कने आतापर्यंत २४ बळी आपल्या नावावर केले आहेत. दुखापतीमुळे नुकताच स्पर्धेबाहेर पडलेल्या शॉन मार्शच्या जागी पीटर हँड्सकाँबचा समावेश करण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूला आफ्रिकेच्या संघातील फिरकीपटू इम्रान ताहिरचा हा शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून त्याला गोड भेट देण्याचा आफ्रिकेच्या संघाचा मानस असणार आहे.
दोन्ही संघ असे -
- ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी, नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, पीटर हँड्सकाँब, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा.
- दक्षिण अफ्रिका - फाफ डु प्लेसी (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडेन मार्कराम, हाशिम अमला, जेपी डुमिनी, डेविड मिलर, कैगिसो रबाडा, ड्वेन पर्टोरियस, एंडिले फेलुकवायो, तबरेज शम्शी, इमरान ताहिर, लुंगी एनगिडी, क्रिस मौरिस, रासी वैन डर दुसेन आणि बी हेंड्रिक्स.