कोलकाता - बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) वेस्ट इंडीजचे माजी फलंदाज एव्हर्टन वीक्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ईडन गार्डन स्टेडियममध्ये बांधल्या जाणाऱ्या संग्रहालयात वीक्स यांना जागा मिळेल, अशी सीएबीने घोषणा केली. वेस्ट इंडीज किक्रेटमधील महान फलंदाज म्हणून ओळखले जाणारे सर एवर्टन वीक्स यांचे बुधवारी वयाच्या 95 व्या वर्षी बार्बाडोसमध्ये निधन झाले.
कॅबचे अध्यक्ष अभिषेक दालमिया म्हणाले, "क्रिकेटमध्ये वीक्स हे एक मोठे नाव होते. त्यांची उणीव संपूर्ण क्रीडा जगाला जाणवेल. विशेषत: स्वतंत्र भारताच्या ईडन गार्डनमध्ये त्यांनी झळकावलेले पहिले शतक आमच्या लक्षात राहतील. येथील क्रिकेट संग्रहालयात त्याच्या नावाला कायमस्वरुपी स्थान देण्यात येईल, असा आम्ही निर्णय घेतला आहे. कोरोनाव्हायरसचा प्रभाव कमी झाल्यावर संग्रहालयाचे काम सुरू होईल.''
-
#EvertonWeekes to feature in Cricket Museum at #EdenGardens
— CABCricket (@CabCricket) July 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Cricket Association of Bengal, while mourning the demise of West Indian legend Sir Everton Weekes, today announced that the iconic cricketer would feature in the soon to come up Cricket Museum at Eden Gardens.#CAB pic.twitter.com/CQ1puKJSpY
">#EvertonWeekes to feature in Cricket Museum at #EdenGardens
— CABCricket (@CabCricket) July 2, 2020
The Cricket Association of Bengal, while mourning the demise of West Indian legend Sir Everton Weekes, today announced that the iconic cricketer would feature in the soon to come up Cricket Museum at Eden Gardens.#CAB pic.twitter.com/CQ1puKJSpY#EvertonWeekes to feature in Cricket Museum at #EdenGardens
— CABCricket (@CabCricket) July 2, 2020
The Cricket Association of Bengal, while mourning the demise of West Indian legend Sir Everton Weekes, today announced that the iconic cricketer would feature in the soon to come up Cricket Museum at Eden Gardens.#CAB pic.twitter.com/CQ1puKJSpY
सर एवर्टन वीक्स यांच्या निधनाबद्दल जगभरातील क्रिकेट खेळाडूंनी दु:ख व्यक्त केले आहे. भारताचा माजी कसोटी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, बिशनसिंग बेदी यांनी ट्विटरवरून वीक्स यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
वीक्स यांचा 1948 ते 1958 दरम्यान वेस्ट इंडीजच्या संघात फलंदाज म्हणून समावेश होता. वीक्स त्यांच्या कारकिर्दीत 48 कसोटी सामने खेळले यामध्ये त्यांनी 4 हजार 455 धावा काढल्या. त्यांची सरासरी 58.61 एवढी होती. कसोटी सामन्यांमध्ये त्यांची 207 ही सर्वोच्च धावसंख्या होती.