ETV Bharat / sports

IND VS WI २nd ODI : भारतीय संघात स्थान मजबूत करण्याची 'या' खेळाडूंना संधी

भारत विरुध्द वेस्ट इंडिज संघामध्ये आज ( रविवारी ) दुसरा एकदिवसीय सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये रंगणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा, श्रेयस अय्यर, केदार जाधव यांच्या कामगिरीकडे असतील. संघातील स्थान पक्के करण्यासाठी त्यांना आज चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

IND VS WI २nd ODI : भारतीय संघात स्थान मजबूत करण्याची 'या' खेळाडूंना संधी
author img

By

Published : Aug 11, 2019, 9:48 AM IST

पोर्ट ऑफ स्पेन - भारत विरुध्द वेस्ट इंडिज संघामध्ये आज ( रविवारी ) दुसरा एकदिवसीय सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये रंगणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा, श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडे असतील. संघातील चौथे स्थान पक्के करण्यासाठी अय्यरला ही मोठी संधी असून त्याला आज आपली प्रतिभा दाखवत चांगला खेळ करावा लागेल.

हा सामना श्रेयस अय्यरसोबत केदार जाधवसाठी महत्वाचा आहे. कारण युवा खेळाडू शुभमन गिल खोऱ्याने धावा जमवत आहे. यामुळे केदारला संघातील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी, चांगली कामगिरी करावी लागणार आहे. मात्र, केदार जाधव फलंदाजीसोबत कामचलावू गोलंदाजी करत असल्याने, त्याचे पारडे जड ठरु शकते.

फिरकीपटूंमध्ये कोणाला संधी -
आजच्या सामन्यात, कुलदीप यादव की रविंद्र जडेजा हे सांगणे कठीण आहे. मात्र, रविंद्र जडेजा फिरकी गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतो. यामुळे जडेजाची अंतिम ११ मध्ये वर्णी लागू शकते. तर खेळपट्टी पाहून युजवेंद्र चहलला जलदगती गोलंदाज खलील अहमदच्या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते.

भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र्र जडेजा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज संघ -
जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, शिमरोन हेटमायर, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, कार्लोस ब्रेथवेट, शाय होप, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अ‍ॅलेन, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.