मुंबई - इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ या मालिकेसाठी चेन्नईत दाखल झाले आहेत. उभय संघात ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्याला सुरूवात होण्याआधी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात बुमराह भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजीची नकल करताना पाहायला मिळत आहे.
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन बुमराहचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात बुमराह अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजीची नकल करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, त्याने फेकलेले चेंडू कुंबळे यांच्या फिरकीप्रमाणे झपकन आत वळत आहेत. जसप्रीत बुमराह आपल्या अचूक यॉर्करने भल्याभल्या फलंदाजाची भंबेरी उडवताना अनेकदा पाहायला मिळाला. आता त्याची फिरकी गोलंदाजी पाहून नेटिझन्स त्याच्यावर फिदा झाले आहेत. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
We have all seen @Jaspritbumrah93's fiery yorkers and sharp bouncers. Here’s presenting a never-seen-before version of the fast bowler.
— BCCI (@BCCI) January 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Boom tries to emulate the legendary @anilkumble1074's bowling action and pretty much nails it! pic.twitter.com/wLmPXQGYgC
">We have all seen @Jaspritbumrah93's fiery yorkers and sharp bouncers. Here’s presenting a never-seen-before version of the fast bowler.
— BCCI (@BCCI) January 30, 2021
Boom tries to emulate the legendary @anilkumble1074's bowling action and pretty much nails it! pic.twitter.com/wLmPXQGYgCWe have all seen @Jaspritbumrah93's fiery yorkers and sharp bouncers. Here’s presenting a never-seen-before version of the fast bowler.
— BCCI (@BCCI) January 30, 2021
Boom tries to emulate the legendary @anilkumble1074's bowling action and pretty much nails it! pic.twitter.com/wLmPXQGYgC
अनिल कुंबळे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ६१९ गडी टिपले आहेत. ते कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन हे त्यांच्याआधी आहेत. मुरलीधरनच्या नावे ८०० तर वॉर्नने ७०८ विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा - इंग्लंडचे भारत दौरे : दारुण पराभव ते २६/११ हल्ल्यातील शहिदांना वाहिलेला कसोटीविजय
हेही वाचा - आयपीएल भारतात होण्याची शक्यता, बीसीसीआयचे संकेत