ETV Bharat / sports

पत्नी आणि मुलांची आली आठवण; पाकचा दिग्गज दौरा मध्यात सोडून परतणार - Waqar Younis

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस हे मायदेशी परतणार आहेत. त्यांना त्यांच्या कुटूंबियांशी वेळ घालवायचा आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तान बोर्डाकडे सुट्टीची मागणी केली होती. पाक बोर्डाने त्यांची सुट्टी मंजूर केली आहे.

Waqar Younis To Return To Pakistan After First Test Against New Zealand
पत्नी आणि मुलांची आली आठवण; पाकचा दिग्गज दौरा मध्यात सोडून परतणार
author img

By

Published : Dec 22, 2020, 4:56 PM IST

नेपियर - पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघात टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर उभय संघात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यानंतर पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस हे मायदेशी परतणार आहेत. त्यांना त्यांच्या कुटूंबियांशी वेळ घालवायचा आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तान बोर्डाकडे सुट्टीची मागणी केली होती. पाक बोर्डाने त्यांची सुट्टी मंजूर केली आहे.

पीसीबीने पत्रकार प्रसिद्धी पत्रकात म्हणलं आहे की, वकार युसूस यांनी बोर्डाकडे सुट्टीबाबत मागणी केली होती. ते आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू इच्छित आहेत. ते दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मायदेशी म्हणजे पाकिस्तानात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघासोबत जुळतील.

पाकिस्तान संघाचे मॅनेजर मन्सूर राणा यांनी सांगितलं की, वकार युनूस हे जूनपासून आपल्या कुटुंबियांपासून दूर आहेत. न्यूझीलंड विरुद्धची मालिकासंपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकचा दौरा करणार आहे. हा दौरा १४ फेब्रुवारीपर्यंत आहे. यामुळे त्यांना आता सुट्टी देण्यात आली आहे. ते आपल्या कुटुंबियाशी वेळ घालवून परत ते संघासोबत जुळतील.

दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघातील पहिला सामना २६ डिसेंबर तर दुसरा सामना २ जानेवारीपासून खेळला जाणार आहे. हे सामने अनुक्रमे माऊंट मोनगानुइ आणि क्राइस्टचर्च येथील मैदानात खेळले जाणार आहेत.

वकार यांची पत्नी आहे डॉक्टर

वकार युनूस यांची पत्नी फरयाल या पेशाने डॉक्टर आहे. कोरोना काळात त्या सेवा बजावत आहेत. या दरम्यान, वकार यांनी सोशल मीडियावर पत्नीचे कौतूक केले. त्यांनी मला माझ्या पत्नीवर अभिनान असल्याचे सांगत ती एक हिरो असल्याचे म्हटलं आहे.

हेही वाचा - मुंबईत नाईट क्लबवर पोलिसांचा छापा; सुरैश रैनासह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा - Boxing Day कसोटीआधी अजिंक्य रहाणेसाठी वसीम जाफरने लिहला 'सीक्रेट' मॅसेज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.