मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आभार मानले आहेत. धोनीने स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीनंतर, अनेकांनी त्याला भावी जीवनप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बीसीसीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कोहली म्हणाला, "कधीकधी शब्द आयुष्यात कमी पडतात आणि मला वाटते की हा एक क्षण आहे. मी फक्त इतकेच म्हणू शकतो की तू नेहमीच असा व्यक्ती आहेस जो बसमध्ये शेवटच्या सीटवर बसतो. आमच्यात चांगली मैत्री आणि समंजसपणा आहे. कारण आम्ही नेहमीच तीच भूमिका बजावली, जी संघासाठी फायदेशीर ठरेल.''
-
"I've always said this and I will say it again, you will always be my Captain," #TeamIndia Skipper @imVkohli pays his tribute to @msdhoni who announced his retirement from international cricket at 1929 hours yesterday.#ThankYouMSD pic.twitter.com/U6uWlow4lB
— BCCI (@BCCI) August 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">"I've always said this and I will say it again, you will always be my Captain," #TeamIndia Skipper @imVkohli pays his tribute to @msdhoni who announced his retirement from international cricket at 1929 hours yesterday.#ThankYouMSD pic.twitter.com/U6uWlow4lB
— BCCI (@BCCI) August 16, 2020"I've always said this and I will say it again, you will always be my Captain," #TeamIndia Skipper @imVkohli pays his tribute to @msdhoni who announced his retirement from international cricket at 1929 hours yesterday.#ThankYouMSD pic.twitter.com/U6uWlow4lB
— BCCI (@BCCI) August 16, 2020
विराट पुढे म्हणाला, ''तुझ्या नेतृत्वात, तुझ्यासोबत खेळताना मला आनंद झाला. तु माझ्यावर विश्वास दाखवला. ज्यासाठी मी नेहमीच तुझा आभारी राहीन. मी यापूर्वीही म्हटले होते, आणि पुन्हा म्हणेन, की तू नेहमीच माझा कर्णधार असशील."
धोनीने आपल्या कारकीर्दीत भारतासाठी २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक, 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया चषक आणि कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाला अव्वल स्थान मिळवून दिले होते. याच कालावधीत कर्णधार म्हणून धोनीने यशाचे शिखर गाठले. त्याच वेळी जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून धोनी नावारुपाला आहे.