सिडनी - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे जगभरात चाहते आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याचे चाहते कमी झालेले नाहीत. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतही धोनीप्रेमी दिसून आले. या चाहत्यांनी मैदानात आणलेले धोनीसाठीचे बॅनर पाहून विराट कोहलीनेही त्यांना खास प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - धवनचा धोनीला धोबीपछाड, मोठ्या विक्रमात टाकले मागे
सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसर्या टी-२० सामन्यात ही घटना पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजी करताना विराट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी काही भारतीय चाहत्यांनी भारताचा धोनीची आठवण काढली. अनेक चाहत्यांनी हातामध्ये ‘वुई मिस यू धोनी’ अशा प्रकारचे पोस्टर घेतले होते. हे पोस्टर पाहून विराटनेही 'मी टू' असा इशारा करत चाहत्यांची मने जिंकली.
-
Even @imVkohli Too Miss Our Master @msdhoni 😖#MSDhoni | #Dhoniforlife @DhoniArmyTN | @TeluguMSDians pic.twitter.com/gW5d4pjTKt
— MSD Kingdom™ (@MSDKingdom) December 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Even @imVkohli Too Miss Our Master @msdhoni 😖#MSDhoni | #Dhoniforlife @DhoniArmyTN | @TeluguMSDians pic.twitter.com/gW5d4pjTKt
— MSD Kingdom™ (@MSDKingdom) December 7, 2020Even @imVkohli Too Miss Our Master @msdhoni 😖#MSDhoni | #Dhoniforlife @DhoniArmyTN | @TeluguMSDians pic.twitter.com/gW5d4pjTKt
— MSD Kingdom™ (@MSDKingdom) December 7, 2020
धोनीची कारकीर्द -
३९ वर्षीय धोनीने आतापर्यंत भारतासाठी ३५० एकदिवसीय ९८ टी-२० सामने खेळले असून त्याने अनुक्रमे १०७७३ आणि १६१७ धावा केल्या आहेत. २००५ ते २०१४ या कालावधीत धोनीने ९० कसोटी सामने खेळले. या प्रकारात त्याने ४८७६ धावा ठोकल्या.
चेनन्नईची आयपीएल कामगिरी -
चेन्नईने १३व्या हंगामात सर्वांना निराश केले. पहिला सामना जिंकल्यानंतर चेन्नईची एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरली, ती प्ले ऑफच्या शर्यतीतून बादच झाली. पण, मागील दोन सामन्यांत विजय मिळवून चेन्नईच्या खेळाडूंनी त्यांच्यातला स्पार्क दाखवला आहे. पण ते स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. या नामुष्कीनंतर आयपीएल २०२१साठी संघात बरेच बदल केले जातील, याचे संकेत फ्रँचायझीने दिले आहेत. तर, संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी पुढच्या वर्षी धोनीच संघाचा कर्णधार असेल असे सांगितले आहे.