ETV Bharat / sports

विराट कोहलीच्या शतकाची पाटी कोरी, पुण्यात दुष्काळ संपणार? - विराट कोहलीचे विक्रम

विराट सद्यस्थितीत कर्णधारपदाच्या दडपणाखाली खेळत असल्याने, त्याला अपेक्षित कामगिरी करता येत नसल्याचे दिसते. कसोटीत विराट इज द बेस्ट असे म्हटले जात असे. मात्र विराटला चालू २०१९ वर्षात अद्याप एकही शतक झळकवता आलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये ८० सामन्यात २५ शतकं झळकवणाऱ्या विराटने शेवटची शतकी खेळी डिसेंबर २०१८ मध्ये केली होती.

विराट कोहलीच्या शतकाची पाटी कोरी, पुण्यात दुष्काळ संपणार?
author img

By

Published : Oct 9, 2019, 11:38 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी २०१९ हे वर्ष चांगले राहिले. मात्र, फलंदाज म्हणून विराटची कामगिरी सामान्य राहिली. या सामान्य कामगिरीचा फटका त्याला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत बसला. काही आठवड्यांपूर्वी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला विराट दुसऱ्या स्थानावर घसरला गेला आहे.

विराट सद्यस्थितीत कर्णधारपदाच्या दडपणाखाली खेळत असल्याने, त्याला अपेक्षित कामगिरी करता येत नसल्याचे दिसते. कसोटीत विराट इज द बेस्ट असे म्हटले जात असे. मात्र विराटला चालू २०१९ वर्षात अद्याप एकही शतक झळकवता आलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये ८० सामन्यात २५ शतकं झळकवणाऱ्या विराटने शेवटची शतकी खेळी डिसेंबर २०१८ मध्ये केली होती.

डिसेंबरच्या त्या खेळीनंतर विराटने एकूण १० कसोटी डावात फलंदाजी केली. त्यात त्याने तीन अंकी आकडा गाठला नाही. मागील १० डावातील विराटचा सर्वोत्तम धावसंख्या ८२ आहे. दरम्यान, विराट या १० डावांमध्ये दोन वेळा खाताही उघडू शकला नाही. दरम्यान, उद्या गुरूवार पासून सुरू होणाऱ्या आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीवर नजर असणार आहे.

हेही वाचा - IND VS SA : टीम इंडियासमोर ३ आव्हानं; आफ्रिकेचा संघ, साळगांवकराची खेळपट्टी अन्...

हेही वाचा - भारताचा आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय, प्रियाची पदार्पणातच दणकेबाज खेळी

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.