लंडन - भारतीय क्रिकेट संघ आज साऊदम्पटन येथील रोज बाऊल स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच सामना असणार असून, या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला २ खास विक्रम करण्याची संधी असणार आहे.
वनडे क्रिकेटमध्ये ११ हजार धावा करण्याची संधी
विराट कोहलीला या सामन्यात वनडे क्रिकेटमध्ये ११ हजार धावा करण्याची संधी असणार आहे. सध्या वनडेमध्ये विराटच्या नावावर १० हजार ८४३ धावा असून ११ हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी त्याला १५७ धावांची गरज आहे. भारतासाठी वनडेमध्ये ११ हजार धावा फक्त सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली यांना करता आल्या आहेत.
वनडेत अर्धशतकांचा अर्धशतक करण्याची संधी
आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने अर्धशतक केल्यास तो वनडेमध्ये ५० अर्धशतके पुर्ण करेल. जर विराटने आज अर्धशतक केल्यास अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातला २६ वा फलंदाज असेल.