नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांना 'दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू' या पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे. कोहली आणि अश्विन व्यतिरिक्त इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांचा या नामांकनात समावेश आहे. विराट कोहलीला या पुरस्कारांसाठी पाच विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे.
विराटच्या नावावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके असून, सर्वाधिक शतके नोंदवणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन तेंडुलकर (१००) पहिल्या आणि रिकी पाँटिंग (७१) दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक एकूण धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराट (२१,४४४ धावा) सचिन आणि पाँटिंगनंतर तिसऱ्या स्थानावर आहे. या पुरस्कारांसाठी आयसीसीच्या संकेतस्थळावर सर्व विभागांमधील खेळाडूंना मत देण्याची सुविधा चाहत्यांना उपलब्ध आहे. सर्वाधिक मते मिळणाऱ्या खेळाडूला पुरस्कार दिला जाणार आहे.
खेळाडूंना मिळालेली नामांकने -
- दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू- विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, लसिथ मलिंगा, मिचेल स्टार्क, एबी डिव्हिलियर्स, कुमार संगकारा.
- दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू- विराट कोहली, जो रूट, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, जेम्स अँडरसन, रंगना हेराथ, यासिर शाह.
- दशकातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू- रोहित शर्मा, राशिद खान, विराट कोहली, इम्रान ताहीर, आरोन फिंच, लसिथ मलिंगा, ख्रिस गेल.
- दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू- एलिस पेरी, मेग लॅनिंग, सुझी बेट्स, स्टेफनी टेलर, मिताली राज, सारा टेलर.
- दशकातील सर्वोत्तम टी-२० महिला क्रिकेटपटू- मेग लॅनिंग, सोफी डिव्हाइन, एलिस पेरी, डीआंड्रा डॉटीन, एलिसा हेली, अन्य श्रबसोल.
- दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटू- मेग लॅनिंग, एलिस पेरी, मिताली राज, सुझी बेट्स, स्टेफनी टेलर, झुलन गोस्वामी.
- दशकातील खेळभावनेचा पुरस्कार- विराट कोहली, केन विल्यमसन, ब्रेंडन मॅक्कलम, मिसबाह उल हक, महेंद्रसिंह धोनी, अन्या श्रबसोल, कॅथरिन बर्न्ट, महेला जयवर्धने, डॅनियल व्हेटोरी.