ETV Bharat / sports

विजय हजारे करंडक : नवख्या छत्तीसगडने केला दिग्गज मुंबईचा पराभव - विजय हजारे करंडक २०१९

विजय हजारे करंडक स्पर्धेत नवख्या छत्तीसगडच्या संघाने दिग्गज मुंबई संघाचा पराभव केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात छत्तीसगडने मुंबईवर ५ धावांनी मात केली. या लढतीत मुंबईच्या फलंदाजांनी कमावले तर गोलंदाजांनी सामना गमावला.

विजय हजारे करंडक : नवख्या छत्तीसगडने केला दिग्गज मुंबईचा पराभव
author img

By

Published : Sep 28, 2019, 7:49 PM IST

नवी दिल्ली - विजय हजारे करंडक स्पर्धेत नवख्या छत्तीसगडच्या संघाने दिग्गज मुंबई संघाचा पराभव केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात छत्तीसगडने मुंबईवर ५ धावांनी मात केली. या लढतीत मुंबईच्या फलंदाजांनी कमावले तर गोलंदाजांनी सामना गमावला. छत्तीसगडचा अमनदीप खरेने नाबाद शतकी खेळी करत संघाला पहिला विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिंकून छत्तीसगडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मुंबईचे सलामीवीर जय बिस्ता आणि आदित्य तरे या दोघांनी सावध सुरुवात केली. जय बिस्ताला शशांक सिंहने माघारी धाडत मुंबईला पहिला धक्का दिला. यानंतर मात्र, मुंबईच्या फलंदाजांनी छत्तीसगडच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. आदित्य तरे, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने ५ बाद ३१७ धावा केल्या.

हेही वाचा - #HBDLataDidi : 'आईची माया लावणाऱ्या लतादीदी', मास्टर ब्लास्टरने दिल्या शुभेच्छा

आदित्य तरेने सर्वाधिक ९० धावा केल्या, तर सुर्यकुमार यादव (८१) आणि कर्णधार श्रेयस अय्यर(५०) धावा करत संघाला ३०० पार करुन दिले. ३१८ धावांचं डोंगर घेऊन मैदानात उतरलेल्या छत्तीसगडच्या संघाची सुरूवात खराब झाली. धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर शशांक चंद्रशेखर माघारी परतला. यानंतर जिवनज्योत सिंह आणि आशुतोष सिंह यांनी भागीदारी करत छत्तीसगडचा डाव सावरला.

या दोघांना शम्स मुलानीने बाद केले. तेव्हा अमनदीप खरेने ताबडतोड खेळी करत शतक झळकावले. खरेने ९४ चेंडूत८ चौकार आणि ४ षटकारांच्या साह्याने ११७ धावा केल्या. त्याला शशांक सिंह आणि अजय मंडलने साथ दिली. मुंबईकडून शम्स मुलानीने २ बळी घेत चांगली झुंज दिली. मात्र अखेर छत्तीसगडने ५ धावांनी बाजी मारत मुंबईला धक्का दिला.

हेही वाचा - रोहित शर्माचे शतक 'इतक्या' धावांनी हुकले

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.