कोलंबो - ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम मुडी यांची श्रीलंकेच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेटने रविवारी ही माहिती दिली. श्रीलंका क्रिकेट संघाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनेनुसार दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध श्रीलंकेच्या खराब कामगिरीनंतर मुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मुडींसोबत तीन वर्षांचा करार केला आहे. या करारानुसार त्यांना ३०० दिवस अनिवार्य काम करावे लागेल. त्यांची नियुक्ती सोमवारपासून लागू होणार आहे.
मुडींच्या कार्यामध्ये भावी दौर्याच्या वेळापत्रकांचे विश्लेषण, घरगुती स्पर्धाची रचना, खेळाडूंचे कल्याण, शिक्षण आणि कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि सहाय्यक कर्मचार्यांची रचना इत्यादींचा समावेश आहे. मुडी हे २००५ ते २००७ या काळात श्रीलंकेचे प्रशिक्षक होते. या काळात संघाने २००७ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
हेही वाचा - IND VS ENG : रोहित शर्माने खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना केलं ट्रोल