ETV Bharat / sports

सचिनला बाद केल्याने, मला आणि पंचांना मिळाली जीवे मारण्याची धमकी, इंग्लंड गोलंदाजाचा दावा

ब्रेसनन याने सांगितले की, '२०११ मध्ये सचिनने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळताना आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या करिअरमधील ९९ वे शतक झळकावले. यानंतर तो इंग्लंड दौऱ्यावर आला. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात तो ९१ धावांवर खेळत होता. तेव्हा माझ्या गोलंदाजीवर पंच रुड टकर यांनी लेग साईडला जाणाऱ्या चेंडूवर सचिनला बाद ठरवले. यानंतर मला आणि पंच रुड यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाली.

tim bresnan received death threats after denying sachin tendulkar his 100th ton
सचिनला बाद केल्याने, मला आणि पंचांना मिळाली जीवे मारण्याची धमकी, इंग्लंड गोलंदाजाचा दावा
author img

By

Published : Jun 8, 2020, 8:02 AM IST

मुंबई - सचिन तेंडुलकर याला १०० वे शतक करण्यास रोखल्याने, मला आणि पंच रुड टकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असा दावा इंग्लंडचा गोलंदाज टिम ब्रेसनन याने केला आहे. ब्रेसनन याने 'यॉर्कशर क्रिकेट कवर्स ऑफ पॉडकास्ट'मध्ये बोलताना हा दावा केला.

ब्रेसनन याने सांगितले की, '२०११ मध्ये सचिनने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळताना आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या करिअरमधील ९९ वे शतक झळकावले. यानंतर तो इंग्लंड दौऱ्यावर आला. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात तो ९१ धावांवर खेळत होता. तेव्हा माझ्या गोलंदाजीवर पंच रुड टकर यांनी लेग साईडला जाणाऱ्या चेंडूवर सचिनला बाद ठरवले. यानंतर मला आणि पंच रुड यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाली.

ही धमकी एकदा नव्हे तर अनेकदा देण्यात आली. काही लोकांनी तर मला पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली. यात त्यांनी सचिनला तू बाद कसा केलास, असा जाब विचारला. तो चेंडू लेग साईडला जात होता. असे चाहत्यांचे म्हणणे होते.

धमकीमुळे टकर आणि माझ्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचेही ब्रेसननने सांगितले. दरम्यान, सचिनने २०१२ मध्ये आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध खेळताना १०० वे शतक पूर्ण केले. तो अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने कसोटी १५ हजार ९२१ तर एकदिवसीयमध्ये १८ हजार ४२६ धावा केल्या आहेत. सचिनने ऑक्टोबर २०१३ मध्ये निवृत्ती स्वीकारली.

हेही वाचा - आयसीसीचा 'बॉस' होण्यासाठी कनेरियाचा गांगुलीला पाठिंबा

हेही वाचा - आयपीएल-२०२० भारताबाहेर..? युएई क्रिकेट बोर्ड आयोजन करण्यास तयार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.