ETV Bharat / sports

यंदाचा रणजीचा हंगाम वसीम जाफरसाठी ठरणार 'खास'....का ते वाचा

४१ वर्षीय वसीम जाफर परत एकदा आगामी रणजी स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदा होणारी ही स्पर्धा जाफरसाठी खूप कारणांनी खास असणार आहे.

author img

By

Published : Dec 8, 2019, 5:48 PM IST

This year's Ranji trophy season will be a special one for Wasim Jaffer
यंदाचा रणजीचा हंगाम वसीम जाफरसाठी ठरणार 'खास'....का ते वाचा

मुंबई - भारतामध्ये क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी असलेल्या या देशात फक्त ११ खेळाडू देशासाठी क्रिकेट खेळतात. त्यामुळे अनेक गुणी आणि तंत्रशुद्ध शैली जपणाऱ्या क्रिकेटपटूंना फार कमी प्रमाणावर संधी मिळते. काही खेळाडू एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूला लाजवेल, अशी कामगिरी स्थानिक स्तरावरच करुन ठेवतात. त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे क्रिकेटपटू वसीम जाफर.

हेही वाचा - ब्रिस्बेन हिट ठरला बिग बॅश महिला लीगचा विजेता, सलग दुसऱ्यांदा पटकावलं जेतेपद

क्रिकेटमधील भारतातील महत्वाची मानली जाणारी स्थानिक स्पर्धा म्हणजे रणजी ट्रॉफी. या स्पर्धेत नावलौकिक कमावलेले अनेक युवा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होतात. ४१ वर्षीय वसीम जाफर परत एकदा आगामी रणजी स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदा होणारी ही स्पर्धा जाफरसाठी खूप कारणांनी खास असणार आहे.

भारताकडून ३१ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळलेला अनुभवी फलंदाज वसीम जाफरसाठी, सोमवारपासून सुरू होणारा रणजी करंडकातील २०१९-२० चा हंगाम अनेक मार्गांनी खास ठरणार आहे. जाफरने मागील मोसमात विदर्भाकडून खेळताना १०३७ धावा केल्या आहेत. त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळे विदर्भ संघाने सलग दुसर्‍यांदा रणजीचे विजेतेपद पटकावले.

यंदाच्या मोसमातील पहिला सामना जाफरच्या कारकीर्दीचा १५० वा रणजी सामना ठरणार आहे. शिवाय, तो रणजी स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू म्हणून एक मोठा विक्रमही रचणार आहे. इतकेच नव्हे तर, प्रथम श्रेणी कारकीर्दीत २० हजार धावांचा आकडा पार करण्यासाठी जाफरला ८५४ धावांची आवश्यकता आहे. जाफरच्या खात्यात सध्या १९१४७ धावा जमा आहेत.

या स्पर्धेत जाफरने तीन झेल घेतले तर, तो या स्पर्धेत २०० झेल घेणारा रणजी इतिहासातील पहिला खेळाडू ठरणार आहे. भारताकडून जाफरने ५ शतके आणि ११ अर्धशतकांच्या मदतीने ३१ कसोटी सामन्यांच्या ५८ डावांमध्ये १९४४ धावा केल्या आहेत. २१२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. शिवाय, त्याच्या नावावर कसोटी सामन्यांमध्येही २७ झेलही जमा आहेत. एकदिवसीय सामन्यांपर्यंत जाफरने दोन सामन्यांत १० धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५७ शतकांची नोंद आहे. यामध्ये ३१४ धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

Intro:Body:

This year's Ranji trophy season will be a special one for Wasim Jaffer

wasim jaffer Ranji trophy special news, wasim jaffer latest news, Wasim Jaffer Ranji 2019-10 news, Wasim Jaffer this year news, वसीम जाफर लेटेस्ट न्यूज, वसीम जाफर रणजी स्पर्धा २०१९-२० न्यूज

यंदाचा रणजीचा हंगाम वसीम जाफरसाठी ठरणार 'खास'....का ते वाचा

मुंबई - भारतामध्ये क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी असलेल्या या देशात फक्त ११ खेळाडू देशासाठी क्रिकेट खेळतात. त्यामुळे अनेक गुणी आणि तंत्रशुद्ध शैली जपणाऱ्या क्रिकेटपटूंना फार कमी प्रमाणावर संधी मिळते. काही खेळाडू एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूला लाजवेल, अशी कामगिरी स्थानिक स्तरावरच करुन ठेवतात. त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे क्रिकेटपटू वसीम जाफर.

हेही वाचा - 

क्रिकेटमधील भारतातील महत्वाची मानली जाणारी स्थानिक स्पर्धा म्हणजे रणजी ट्रॉफी. या स्पर्धेत नावलौकिक कमावलेले अनेक युवा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होतात. ४१ वर्षीय वसीम जाफर परत एकदा आगामी रणजी स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदा होणारी ही स्पर्धा जाफरसाठी खूप कारणांनी खास असणार आहे.

भारताकडून ३१ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळलेला अनुभवी फलंदाज वसीम जाफरसाठी, सोमवारपासून सुरू होणारा रणजी करंडकातील २०१९-२० चा हंगाम अनेक मार्गांनी खास ठरणार आहे. जाफरने मागील मोसमात विदर्भाकडून खेळताना १०३७ धावा केल्या आहेत. त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळे विदर्भ संघाने सलग दुसर्‍यांदा रणजीचे विजेतेपद पटकावले. 

यंदाच्या मोसमातील पहिला सामना जाफरच्या कारकीर्दीचा १५० वा रणजी सामना ठरणार आहे. शिवाय, तो रणजी स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू म्हणून एक मोठा विक्रमही रचणार आहे. इतकेच नव्हे तर, प्रथम श्रेणी कारकीर्दीत २० हजार धावांचा आकडा पार करण्यासाठी जाफरला ८५४ धावांची आवश्यकता आहे. जाफरच्या खात्यात सध्या १९१४७ धावा जमा आहेत.

या स्पर्धेत जाफरने तीन झेल घेतले तर, तो या स्पर्धेत २०० झेल घेणारा रणजी इतिहासातील पहिला खेळाडू ठरणार आहे. भारताकडून जाफरने ५ शतके आणि ११ अर्धशतकांच्या मदतीने ३१ कसोटी सामन्यांच्या ५८ डावांमध्ये १९४४ धावा केल्या आहेत. २१२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. शिवाय, त्याच्या नावावर कसोटी सामन्यांमध्येही २७ झेलही जमा आहेत. एकदिवसीय सामन्यांपर्यंत जाफरने दोन सामन्यांत १० धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५७ शतकांची नोंद आहे. यामध्ये ३१४ धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.