नवी दिल्ली - यंदाची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा नियोजित वेळेवर होईल, अशी शक्यता आयसीसीने वर्तवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत ही शक्यता व्यक्त केली.
कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले असून क्रीडाविश्वालाही या व्हायरसने पछाडले आहे. जगातील अनेक स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या असून यंदाच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेवरही त्याचे सावट आहे.
आयसीसीच्या बैठकीनंतर सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले, की टी-२० विश्वचषक वेळेवर होणार असून रणनीतीमध्ये बदल होणार नाही. यंदाचा टी-10 वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान खेळला जाणार आहे