हैदराबाद - भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या राजीव गांधी स्टेडिअम, हैदराबाद येथे पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. टी-ट्वेन्टी मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने विराटसेना मैदानात उतरेल. तर, टी-ट्वेन्टी मालिकेतील विजयी लय कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा संघ प्रयत्न करेल.
इंग्लंड येथे होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडकाच्या तयारीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी ५ सामन्यांची ही एकदिवसीय मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मालिकेद्वारे दोन्ही संघांना अंतिम संघ निवडण्यास मदत होणार आहे. विश्वकरंडकात आत्मविश्वास वाढण्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली कोणत्याही परिस्थितीत मालिका विजयाचा प्रयत्न करेल. भारतीय संघासाठी ही मालिका अधिक निर्णायक असून या मालिकेद्वारे खेळाडूंना संघात जागा पक्की करण्याची शेवटची संधी असणार आहे.
सामन्याची वेळ - दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी ( भारतीय प्रमाणवेळेनुसार)
कोठे पाहणार - स्टार स्पोर्टस नेटवर्क, डीडी नॅशनल आणि हॉटस्टार (ऑनलाईन)