चेन्नई - आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघांनी आपली जय्यत तयारी सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे संघ यूएईत दाखल झाले. आता मागील हंगामाच उपविजेता असलेला महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्जही (सीएसके) यूएईसाठी रवाना झाला आहे. यूएईला जाण्यासाठी सीएसकेच्या खेळाडूंचे चेन्नई विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर या खेळाडूंना तपासण्यात आले आहे.
आयपीएलचा हा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. २०१९च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला एका धावेने हरवून चौथ्यांदा विजेतेपद जिंकले होते.