ETV Bharat / sports

Video: सराव सत्रात नटराजनने टिपला अप्रतिम झेल - भारत वि. ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी न्यूज

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने कस्सून सराव केला. यात टी नटराजनने क्षेत्ररक्षणादरम्यान, पकडलेला झेलचा व्हिडिओ बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.

t natarajan hits practice session takes a spectacular catch running backwards
Video: सराव सत्रात नटराजनने टिपला अप्रतिम झेल
author img

By

Published : Jan 3, 2021, 5:24 PM IST

सिडनी - वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय कसोटी संघात टी नटराजनची वर्णी लागली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. यासामन्यासाठी भारतीय संघाने कस्सून सराव केला. यात टी नटराजन याने क्षेत्ररक्षणादरम्यान, पकडलेला झेलचा व्हिडिओ बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी सराव सत्रात घाम गाळला. यादरम्यान, संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्यासोबत टी नटराजनने फिल्डिंगचा सराव केला. यात टी नटराजनने धावत जाऊन कॅच पकडला. याचा कॅचचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

टी नटराजनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळालेली संधीचे सोने केले, असे कॅप्शन बीसीसीआयने व्हिडिओला दिले आहे. दरम्यान, शुक्रवारी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यासाठी टी नटराजनचा समावेश भारतीय संघात करण्यात आल्याची घोषणा केली. नटराजनने एकदिवसीय आणि टी -२० मालिकेत दमदार कामगिरी केली. त्याने टी-२० मालिकेत ६ गडी बाद केले आहे. यामुळे त्याचा समावेश तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात झाल्यास नवल वाटायला नको.

हेही वाचा - WHAT A START!!..नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटपटूने केला साखरपुडा

हेही वाचा - IND VS AUS : तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाच्या २ खेळाडूंना दुखापत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.