ETV Bharat / sports

IPL २०२० : 'रैना भलेही सुरूवातीचे काही सामने खेळणार नाही, पण तो सीएसकेमध्ये परत येईल' - Suresh Raina will be back in IPL

भारताचे माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी, रैना सीएसकेमध्ये पुनरागमन करू शकतो, असे म्हटलं आहे.

IPL 2020: Suresh Raina will be back playing the IPL says Deep Dasgupta
IPL २०२० : 'रैना भलेही सुरूवातीचे काही सामने खेळणार नाही, पण तो सीएसकेमध्ये परत येईल'
author img

By

Published : Sep 6, 2020, 4:47 PM IST

मुंबई - सुरेश रैना पाठोपाठ हरभजन सिंगने आयपीएल २०२० स्पर्धेतून माघार घेतल्याने, चेन्नई सुपर किंग्जचा संघ अडचणीत आला आहे. अशात भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटूने रैनाबद्दल मत व्यक्त केले आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी, रैना सीएसकेमध्ये पुनरागमन करू शकतो, असे म्हटलं आहे.

एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना दीपदास गुप्ता म्हणाले की, 'सुरेश रैना सीएसकेमध्ये पुनरागमन करेल, असे मला वाटते. क्वारंटाइनच्या नियमामुळे कदाचित त्याला पहिले काही सामने खेळता येणार नाही. पण तो नंतर संघात पुनरागमन करेल. त्यामुळेच बहुधा सीएसकेने अद्याप रैनाच्या ऐवजी संघात कोणत्याही खेळाडूला जागा दिलेली नाही.'

IPL 2020: Suresh Raina will be back playing the IPL says Deep Dasgupta
सुरेश रैना

दरम्यान, सीएसकेने अद्याप सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या जागेवर बदली खेळाडूंची घोषणा केलेली नाही. यामुळे रैनाच्या परतीची आशा वाढली आहे. जर असे घडल्यास, सीएसकेच्या संघाला अधिक बळकटी मिळणार आहे.

आयपीएल २०२०साठी दीप दासगुप्ता यांची निवड कॉमेंट्री पॅनलमध्ये करण्यात आली आहे. ते १३व्या हंगामात कॉमेंट्री करताना दिसून येतील. त्यांनी ८ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. दुसरीकडे सीएसकेच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचा १३वा हंगाम रंगणार आहे.

हेहीव वाचा - IPL 2020 : 'हे' तीन युवा विदेशी खेळाडू झळकावू शकतात शतक

हेही वाचा - IPL 2020 : 'या' सात खेळाडूंनी घेतली माघार, त्यांच्या जागेवर कोण खेळणार, जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.