ETV Bharat / sports

चेतनचे शतक न होण्यास मी कारणीभूत - सुनील गावसकर - sunil gavaskar and chetan chauhan news

चौहान यांना श्रद्धांजली वाहताना सुनील गावसकर म्हणाले- "ये माझी गळाभेट घे, आपण आपल्या जीवनाची अनिवार्य षटके खेळत आहोत, असे चेतन मला भेटल्यावर नेहमी म्हणायचा. आमच्या बैठका त्याच्या आवडीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर होत होत्या, ज्या ठिकाणी तो खेळपट्टी तयार करत असे. जेव्हा आम्ही मिठी मारायचो तेव्हा मी त्याला म्हणायचो ''नाही, आपल्याला आणखी एक शतकी भागीदारी करावी लागेल''. तेव्हा तो हसायचा आणि म्हणायचा, "बाबा, शतक तू बनवत होतास. मी नाही.''

sunil gavaskar pays tribute to ex cricketer chetan chauhan
चेतनचे शतक न होण्यास मी कारणीभूत - सुनील गावसकर
author img

By

Published : Aug 17, 2020, 10:28 AM IST

नवी दिल्ली - भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कोरोनामुळे निर्वतलेले भारताचे माजी सलामीवीर चेतन चौहान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चेतन चौहान यांनी १९६९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्यासोबत त्यांनी भारतासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. गावसकर आणि चौहान यांच्या जोडीने कसोटी सामन्यातील ६० डावात ५४.८५ च्या सरासरीने ३१२७ धावा केल्या होत्या. दोघांनी एकूण ११ शतकांची भागीदारी केली होती.

चौहान यांना श्रद्धांजली वाहताना सुनील गावसकर म्हणाले- "ये माझी गळाभेट घे, आपण आपल्या जीवनाची अनिवार्य षटके खेळत आहोत, असे चेतन मला भेटल्यावर नेहमी म्हणायचा. आमच्या बैठका त्याच्या आवडीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर होत होत्या, ज्या ठिकाणी तो खेळपट्टी तयार करत असे. जेव्हा आम्ही मिठी मारायचो तेव्हा मी त्याला म्हणायचो ''नाही, आपल्याला आणखी एक शतकी भागीदारी करावी लागेल''. तेव्हा तो हसायचा आणि म्हणायचा, "बाबा, शतक तू बनवत होतास. मी नाही.''

गावसकर पुढे म्हणाले, आयुष्यातील अनिवार्य षटकांबद्दलचे त्याचे शब्द इतक्या लवकर प्रत्यक्षात येईल, असे मला माझ्या स्वप्नातदेखील वाटले नव्हते. पुढच्या वेळी जेव्हा मी दिल्लीला जाईन तेव्हा त्याचे हसणे आणि गप्पा नसतील. ऑस्ट्रेलियामध्ये १९८०-८१ मालिकेदरम्यान चेतनचे शतक न होण्यास मी कारणीभूत होतो. जेव्हा अ‌ॅडलेडमधील दुसर्‍या कसोटी सामन्यात तो ९७ धावांवर खेळत होता, तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी मला टीव्ही समोरच्या खुर्चीवरुन उचलले आणि मला खेळाडूंच्या बाल्कनीत नेले. माझ्या जोडीदाराच्या प्रोत्साहनासाठी मी उपस्थित राहावे, असे त्यांनी मला सांगण्यास सुरुवात केली. पण मी थोडा अंधश्रद्धाळू आहे. फलंदाज बाद व्हायचा म्हणून मी ड्रेसिंग रूममध्ये टीव्हीवर सामना बघायचो आणि शतक पूर्ण केल्यावर मी खेळाडूंच्या बाल्कनीत जात होतो. जेव्हा डेनिस लिली गोलंदाजी करायला आला तेव्हा मी अ‌ॅडलेडच्या बाल्कनीमध्ये होतो. त्याच्या पहिल्याच चेंडूवर चेतन झेलबाद झाला. मी निराश झालो. मला बाल्कनीत आणणाऱ्या खेळा़डूंना मी तेथून जायला सांगितले.''

कारकीर्दीत एकही शतक न करता दोन हजार धावा करणारे चेतन चौहान जगातील पहिले क्रिकेटपटू होते. शतक न करता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या नावावर आहे. चौहान यांनी भारताकडून ४० कसोटी आणि ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी अनुक्रमे २०८४ आणि १५३ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चौहान यांनी मोठी कामगिरी केली होती. १७९ प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी २१ शतके आणि ५९ अर्धशतकांसह ११,१४३ धावा केल्या आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी १९६७-१९७५ दरम्यान महाराष्ट्राचे तर, १९७५ ते १९८५ दरम्यान दिल्लीचे प्रतिनिधित्व केले होते. १९८१ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.