अहमदाबाद - भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आजच्या दिवशी १९७१ साली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते. आज कसोटी पदार्पणाला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बीसीसीआयने भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गावसकर यांचा सत्कार केला.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गावसकर यांचा सत्कार केला. या सत्काराचे फोटो बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना बीसीसीआयने, भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर यांच्या कसोटी क्रिकेट पदार्पणाला ५० वर्ष पूर्ण झाली, त्याचे हे सेलिब्रेशन आहे, असे म्हटलं आहे. बीसीसीआयसोबत शाह यांनी देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून गावसकर यांच्या सत्काराचे फोटो शेअर केले आहेत.
-
Celebrating 5️⃣0️⃣ glorious years of the legendary former #TeamIndia Captain Mr. Sunil Gavaskar's Test debut today 🙌🏻 🇮🇳 @GCAMotera @Paytm pic.twitter.com/XVcTJfqypg
— BCCI (@BCCI) March 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Celebrating 5️⃣0️⃣ glorious years of the legendary former #TeamIndia Captain Mr. Sunil Gavaskar's Test debut today 🙌🏻 🇮🇳 @GCAMotera @Paytm pic.twitter.com/XVcTJfqypg
— BCCI (@BCCI) March 6, 2021Celebrating 5️⃣0️⃣ glorious years of the legendary former #TeamIndia Captain Mr. Sunil Gavaskar's Test debut today 🙌🏻 🇮🇳 @GCAMotera @Paytm pic.twitter.com/XVcTJfqypg
— BCCI (@BCCI) March 6, 2021
दरम्यान, गावसकर यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला. या मालिकेत त्यांनी धावांचा पाऊस पाडला. त्यांनी त्या मालिकेत ७७४ धावा केल्या होत्या. १९७१ ते १९८७ या काळात गावसकर यांनी भारतासाठी १२५ कसोटी, १०८ एकदिवसीय सामने खेळली. यात त्यांनी अनुक्रमे १० हजार १२२ आणि ३ हजार ९२ धावा जमवल्या. गावसकर हे १९८३ साली विश्व करंडक जिंकलेल्या भारतीय संघाचे सदस्य होते.
हेही वाचा - WTC Final : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार
हेही वाचा - Ind VS Eng ४th Test : टीम इंडियाने WTC फायनलचे तिकीट मिळवले, अखेरच्या कसोटीत इंग्लंडवर डावाने विजय