माउंट माउंगानुई - भारतीय संघाने न्यूझीलंड विरुध्दचा अखेरचा पाचवा टी-२० सामना ७ धावांनी जिंकला आणि न्यूझीलंड संघाला ५-० ने व्हाईट वॉश दिले. भारतीय संघाने दिलेले १६४ धावांचे आव्हान न्यूझीलंडला पेलवले नाही. न्यूझीलंडचा संघाला २० षटकात ९ बाद १५६ धावा करता आल्या. दरम्यान, या सामन्यात विश्रांती देण्यात आलेला विराट कोहली आणि दुखापतग्रस्त केन विल्यम्सन यांनी संघाबाहेर राहूनही 'गेम स्पिरीट' दाखवले. या दोघांचा फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.
विराट कोहलीला विश्रांती देत भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व दिले. तर केन विल्यम्सन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पाचव्या टी-२० सामन्यात दोघेही वॉटरबॉयच्या भूमिकेत दिसले. या दोघांसोबत ऋषभ पंतही दिसून आला.
-
#SpiritOfCricket 🙌🙌#NZvIND pic.twitter.com/97kkQP8y02
— BCCI (@BCCI) February 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#SpiritOfCricket 🙌🙌#NZvIND pic.twitter.com/97kkQP8y02
— BCCI (@BCCI) February 2, 2020#SpiritOfCricket 🙌🙌#NZvIND pic.twitter.com/97kkQP8y02
— BCCI (@BCCI) February 2, 2020
पाचव्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर म्हणून संधी मिळालेला युवा फलंदाज संजू सॅमसन केवळ २ धावा काढून माघारी परतला. तेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुल यांनी केलेल्या खेळींच्या जोरावर भारताला १६३ धावांपर्यंत मजल मारता आली.
भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १७ अशी झाली. तेव्हा आपला शंभरावा सामना खेळणारा अनुभवी रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली.
नवदीप सैनीने सेफर्ट आणि टेलरला माघारी धाडत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला. सामन्यात ४ षटकात १२ धावा देत ३ गडी बाद करणारा जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. तर केएल राहुलला मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा - IND vs NZ : न्यूझीलंडला 'व्हाईट वॉश', पाचव्या टी-२० सह भारताचा ५-० ने ऐतिहासिक मालिका विजय
हेही वाचा - स्टार फलंदाज शुबमन गिलने झळकावले द्विशतक