मुंबई - माजी कर्णधार सौरव गांगुलीने विश्वचषक २०१९ साठी भारतीय संघाची निवड केली आहे. त्यात १५ सदस्यांच्या संघात युवा फलंदाज रिषभ पंत आणि अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक यांना स्थान दिले नाही. त्याचसोबत अष्टपैलू रवींद्र जडेजालाही संधी दिली नाही.
सौरवने सलामीची जबाबदारी शिखर आणि रोहित यांच्या खांद्यावर दिली आहे. लोकेश राहुल याला वनडाऊनसाठी पसंती दिली. यावेळी सौरव विराटचे कौतुक करत म्हणाला की, तो करिअरमध्ये सर्वेश्रेष्ठ कामगिरी करत आहे.
चौथ्या क्रमांकासाठी त्याने अंबाती रायुडूला पसंती दिली आहे. त्यानंतर केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनी यांना पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी जागा दिली आहे.
गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्याकडे सोपवली आहे. अष्टपैलू म्हणून विजय शंकरला कौल दिला आहे. त्याचवेळी अनुभवी जडेजाला डावलले आहे. पर्यायी यष्टीरक्षक म्हणून कुणाचीही निवड सौरवने केली नाही.
सौरव गांगुली याने २०१९च्या विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ
रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, अंबाती रायुडू, महेंद्र सिंह धोनी, केदार यादव, हार्दिक पांड्या, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव