ETV Bharat / sports

आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप : सिंधु, सायना आणि समीर यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश - samir

दुसऱ्या फेरीत सायनाचा सामना कोरियाच्या किम गा इयून हीच्याशी

सिंधु, सायना
author img

By

Published : Apr 24, 2019, 6:16 PM IST

नवी दिल्ली - भारतीय बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधु, सायना नेहवाल आणि समीर वर्मा या खेळाडूंनी आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

महिला एकेरीच्या सामन्यात बुधवारी सायना नेहवालने चीनच्या हान युईयाला 12-21, 21-11, 21-17 ने पराभूत केले. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या सायनाने एक तास आणि एक सामना आपल्या नावावर केला. दुसऱ्या फेरीत सायनाचा सामना कोरियाच्या किम गा इयून हीच्याशी होणार आहे.

दुसरीकडे ओलंपिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूनेही पहिल्या फेरीत महिला एकेरीच्या दुसऱ्या प्रवेश केला. सिंधूने जपानच्या सायाका ताकाहोशीला 28 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-14, 21-7 असे पराभूत केले. पुढच्या फेरीत सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या चोयरूनिसाशी होणार आहे.

पुरुष एकेरीत समीर वर्माने एक तास आणि सात मिनिटे चाललेल्या सामन्यात जपानच्या काजुमासा सकाई 21-13, 17-21, 21-18 असे पराभूत केले. दुसऱ्या फेरीत समीरचा सामना हँगकॉंगच्या एन. जी. कालोंग अंगुसशी होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.