ETV Bharat / sports

'निवड समितीच्या सदस्याला मी विराटच्या पत्नीची हुजरेगिरी करताना पाहिलयं'

author img

By

Published : Oct 31, 2019, 3:59 PM IST

फारूख हे नेहमी वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी आता एका मुलाखतीत, निवड समितीला लक्ष्य केले. ते मुलाखतीदरम्यान म्हणाले, की 'सध्या असलेल्या निवड समितीकडे अनुभव नाही. ही खरे तर मिकी माऊसवाली समिती आहे. विराट कोहलीचे योगदान भारतासाठी महत्त्वाचे आहे, पण निवड समितीला अनुभव आहे का? संपूर्ण निवड समिती १०-१२ कसोटी सामने खेळलेली आहे.'

'निवड समितीच्या सदस्याला मी विराटची पत्नी अनुष्का याची हुजरेगिरी करताना पाहिलयं'

नवी दिल्ली - भारताचे माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनिअर यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह निवड समितीवर जहरी टीका केली आहे. विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान, निवड समितीतीतील काही लोक अनुष्का शर्माला चहाचा कप देण्याचे काम करत होते, अशा शब्दात इंजिनिअर यांनी निवड समितीचा समाचार घेतला आहे.

फारूख हे नेहमी वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी आता एका मुलाखतीत, निवड समितीला लक्ष्य केले. ते मुलाखतीदरम्यान म्हणाले की, 'सध्या असलेल्या निवड समितीकडे अनुभव नाही. ही खरे तर मिकी माऊसवाली समिती आहे. विराट कोहलीचे योगदान भारतासाठी महत्त्वाचे आहे, पण निवड समितीला अनुभव आहे का? संपूर्ण निवड समिती १०-१२ कसोटी सामने खेळलेली आहे.'

विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान, मी भारतीय संघाचे कोट परिधान केलेल्या एका सदस्याला विचारले, तु कोण आहेस. तेव्हा त्याने सांगितले की मी निवड समितीचा सदस्य आहे. एवढेच काय, मी निवड समितीच्या एका सदस्याला अनुष्काला चहा देण्याचे काम करताना पाहिले असल्याचा, खळबळजनक आरोप इंजिनिअर यांनी केला आहे.

फारूख इंजिनियर यांनी निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर त्यांनी दिलीप वेंगसरकर यांनी निवड समितीच्या प्रमुखपदी यावे, अशी मागणीही केली.

विश्वकरंडक स्पर्धेत अंबाती रायडूला संघात जागा दिली नाही म्हणून निवड समितीवर चहुबाजूंनी टीका करण्यात आली होती. दरम्यान, एमएसके प्रसाद यांच्या समितीची निवड २०१६ मध्ये करण्यात आली आहे. मात्र आता लवकरच निवड समितीचा कार्यकाळ संपणार असून नवी समिती येऊ शकते.

इंजिनियर यांनी सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड योग्य असून तो एक चांगला कर्णधार आहे. तो नेहमी चांगले निर्णय घेतो. आगामी काळात तो भारतीय संघाचा नक्कीच चेहरामोहरा बदलेल, अशी आशाही इंजिनिअरनी व्यक्त केली.

हेही वाचा - बीसीसीआयचा भोंगळ कारभार..! पैसे न दिल्याने, भारतीय संघ अडकला परदेशात

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूचे मानसिक स्वास्थ बिघडले, अनिश्चित काळासाठी खेळणार नाही क्रिकेट

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.