मुंबई - न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी वगळण्यात आलेल्या संजू सॅमसनला दुखापतग्रस्त धवनच्या जागी 'रिप्लेस' करण्यात आले आहे. तर, या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी पृथ्वी शॉची संघात वर्णी लागली आहे.
हेही वाचा - मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला आफ्रिकेनं केलं कर्णधार
न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. श्रीलंकेविरूद्धच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसनची संघात निवड झाली होती. त्याला एकाच सामन्यात अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले. त्या सामन्यात त्याने पहिला चेंडू षटकार लगावला तर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला होता. त्यानंतर न्यूझीलंड मालिकेसाठी भारताच्या संघात संजू सॅमसनला संधी दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, निवड समितीने त्याला वगळले होते.
-
#INDvsNZ India’s ODI squad: Virat Kohli (C), Rohit Sharma (VC), Prithvi Shaw, KL Rahul, Shreyas Iyer, Manish Pandey, Rishabh Pant (WK), Shivam Dube, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Ravindra Jadeja, Jasprit Bumrah, Mohammed Shami, Navdeep Saini, Shardul Thakur, Kedar Jadhav https://t.co/KucddbLz0l
— ANI (@ANI) January 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#INDvsNZ India’s ODI squad: Virat Kohli (C), Rohit Sharma (VC), Prithvi Shaw, KL Rahul, Shreyas Iyer, Manish Pandey, Rishabh Pant (WK), Shivam Dube, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Ravindra Jadeja, Jasprit Bumrah, Mohammed Shami, Navdeep Saini, Shardul Thakur, Kedar Jadhav https://t.co/KucddbLz0l
— ANI (@ANI) January 21, 2020#INDvsNZ India’s ODI squad: Virat Kohli (C), Rohit Sharma (VC), Prithvi Shaw, KL Rahul, Shreyas Iyer, Manish Pandey, Rishabh Pant (WK), Shivam Dube, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Ravindra Jadeja, Jasprit Bumrah, Mohammed Shami, Navdeep Saini, Shardul Thakur, Kedar Jadhav https://t.co/KucddbLz0l
— ANI (@ANI) January 21, 2020
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धवनला दुखापत झाल्याने संजूला न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. तर, पृथ्वी शॉला भारताच्या एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय 'अ' संघाचा सदस्य असून त्याने प्रमुख संघाच्या निवडी आधीच ताबडतोड फलंदाजी करत आपली दावेदारी मजबूत केली होती. रणजी करंडक स्पर्धेत झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर पृथ्वी शॉने दमदार पुनरागमन केले. त्याने न्यूझीलंड इलेव्हन विरुद्ध खेळताना १०० चेंडूत २२ चौकार आणि २ षटकारासह १५० धावा झोडपल्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर.
भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा -
५ सामन्यांची टी-२० मालिका
- पहिली टी-२० - ऑकलंड - २४ जानेवारी
- दुसरी टी-२० - ऑकलंड - २६ जानेवारी
- तिसरी टी-२० - हॅमिल्टन - २९ जानेवारी
- चौथी टी-२० - वेलिंग्टन - ३१ जानेवारी
- पाचवी टी-२० - माऊंट माउंगानुई - ०२ फेब्रुवारी.
३ सामन्यांची एकदिवसीय मालिका -
- पहिला एकदिवसीय सामना - हॅमिल्टन - ०५ फेब्रुवारी
- दुसरा एकदिवसीय सामना - ऑकलंड - ०८ फेब्रुवारी
- तिसरा एकदिवसीय सामना - माऊंट माउंगानुई- ११ फेब्रुवारी